शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वीज जाताच मोबाईल कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

देशभरात खासगी मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. कोरची तालुका मात्र याला अपवाद आहे. कोरची तालुक्यात एकाही ठिकाणी खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर नाही. कोरची व इतर काही गावांमध्ये केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांकडे बीएसएनएलचेच सीम आहेत. सुरूवातीला ग्राहक कमी होते. त्यावेळी सेवा चांगली मिळत होती.

ठळक मुद्देकोरचीतील स्थिती : बीएसएनएल टॉवरच्या बॅटऱ्या खराब, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मोबाईल टॉवर सुरू ठेवण्यासाठी बॅटऱ्यांचा उपयोग केला जातो. मात्र कोरची येथील बहुतांश मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होताच मोबाईल टॉवर काम करणे बंद करते. परिणामी कोरची शहरातील क व्हरेज ठप्प होऊन हजारो मोबाईलधारकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.देशभरात खासगी मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. कोरची तालुका मात्र याला अपवाद आहे. कोरची तालुक्यात एकाही ठिकाणी खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर नाही. कोरची व इतर काही गावांमध्ये केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांकडे बीएसएनएलचेच सीम आहेत. सुरूवातीला ग्राहक कमी होते. त्यावेळी सेवा चांगली मिळत होती. आता ग्राहक वाढल्याने मोबाईल टॉवरची क्षमता सुद्धा वाढविणे आवश्यक होते. मात्र बीसएनएलने याकडे दुर्लक्ष केल्याने वाढत्या ग्राहकांना इंटरनेट स्पिड मिळत नाही. अनेकवेळा मोबाईल व्यस्त असल्याचे दाखविते. त्यामुळे मोबाईलधारक कमालीचे त्रस्त आहेत.मोबाईल व इंटरनेट सेवा २४ तास सुरू असणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईल टॉवरसोबत बॅटरी, जनरेटर राहते. मात्र येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या व्यवस्थित काम करीत नाहीत. तसेच जनरेटरही सुरू केले जात नाही. परिणामी वीज गुल होताच मोबाईल टॉवर काम करणे बंद होते.कोरची तालुका शासन व प्रशासनदरबारी नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. छत्तीसगड राज्याला कोरची तालुक्याची सीमा लागून असल्याने येथील नागरिकांचा छत्तीसगड राज्याशी संपर्क येते. छत्तीसगड राज्यातील गावांमध्ये झालेली प्रगती लक्ष वेधून घेते. तालुक्यात सिंचन सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे जीवनमान अतिशय कनिष्ठ दर्जाचे आहे.छत्तीसगड राज्यातील क व्हरेजचा सहाराछत्तीसगड राज्यातील काही सीमावर्ती गावांमध्ये जीओ कंपनीने मोबाईल टॉवर उभारले आहेत. त्या टॉवरची रेंज कोरची येथील काही निवडक भागांमध्ये उपलब्ध होते. बीएसएनएलची सेवा ठप्प पडते. त्यावेळी नागरिक स्लॅबवर चढून जीओचे कव्हरेज शोधत राहतात. मात्र जीओचे टॉवर कोरचीपासून दूर असल्याने पाहिजे तेवढी स्पिड उपलब्ध होत नाही. कोरची येथे टॉवर उभारावे, यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली. जीओ कंपनी टॉवर उभारण्यास तयार आहे, मात्र प्रशासकीय अडचणी आल्यामुळे त्यांचा टॉवर उभा झालेला नाही.वारंवार नेटवर्क जाण्याबाबत बीएसएनएलच्या कोरची येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, कोरची येथील वीज २४ तासांपासून खंडित आहे. बॅटऱ्या केवळ चार तास चालू शकतात. त्यामुळेच मोबाईल टॉवर बंद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर थ्री-जी सेवा बंद केली जाते. केवळ टू-जी सेवा सुरू राहते, अशी माहिती दिली. सरकारी कंपनी असूनही प्रशासकीय यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :electricityवीजMobileमोबाइल