शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

७० टक्के गावांत ‘मिशन भामरागड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सलग ७ दिवस पूरपरिस्थितीला तोंड देणाºया भामरागड तालुक्यात आरोग्याविषयीच्या समस्या उद्भवू नये म्हणून दि.११ पासून आरोग्य विभागाकडून ‘मिशन भामरागड’ अभियान सुरु करण्यात आले होते.

ठळक मुद्देसाथरोगाचा उद्रेक नाही : अडचणींवर मात करत आरोग्य विभागाने हाताळली परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनेक वर्षांच्या पावसाचा रेकॉर्ड मोडणाऱ्या यावर्षीच्या भामरागड तालुक्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीनंतर आरोग्य विभागाने सुरू केलेले ‘मिशन भामरागड’ ७० टक्के गावांत यशस्वीपणे राबविण्यात आले. तालुक्यातील १२८ गावांपैकी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त गावांमध्ये पोहोचण्यात आरोग्य विभागाच्या चमुला यश आले आहे. त्या गावांमध्ये आरोग्य तपासणीसोबतच आवश्यक ते उपचारही या चमूने केले. विपरित परिस्थितीनंतर भामरागड तालुक्यात जलजन्य किंवा कीटकजन्य आजाराचा उद्रेक रोखण्यात आरोग्य विभागाच्या चमुला यश आले आहे, हे विशेष.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सलग ७ दिवस पूरपरिस्थितीला तोंड देणाºया भामरागड तालुक्यात आरोग्याविषयीच्या समस्या उद्भवू नये म्हणून दि.११ पासून आरोग्य विभागाकडून ‘मिशन भामरागड’ अभियान सुरु करण्यात आले होते. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ४७ जणांच्या चमू शक्य तेवढे नदी-नाले पार करत भामरागड तालुक्यातील जवळपास ८० गावांमध्ये पोहोचून रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. १३ सप्टेंबरपर्यंत या तालुक्यातील ग्रामीण भागात फिरून सर्व पिंजून काढण्याचे उद्दीष्ट होते. परंतू प्रत्यक्षात अनेक गावात पोहोचणे अशक्य झाल्याने या चमुपुढे अनेक अडथळे निर्माण झाले. ती अडथळ्यांची शर्यत पार करत आरोग्य विभागाच्या चमूने ७० टक्के गावांमध्ये आरोग्य तपासणी व उपाययोजना केल्या आहेत.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांच्यासह जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.सुनील मडावी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक, जिल्हा कार्यक्र म व्यवस्थापक डॉ.अनुपम महेशगौरी, तसेच ४ तालुका आरोग्य अधिकारी, ८ वैद्यकीय अधिकारी, २८ आरोग्य सहाय्यक (पुरूष) व आरोग्य सेवक यांचा ‘मिशन भामरागड’च्या चमूत समावेश होता.भामरागड तालुक्यातील १२८ गावांपैकी ७२ गावांमध्ये प्राथमिक औषधोपचार, रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृतीपर कार्यक्र म घेण्यात आले. यासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालयाच्या चमुनेही मोलाचे योगदान दिले आहे. जिल्हास्तरीय चमू परतली असली तरी तालुक्याची चमू दुर्गम गावांमध्ये उपचार देत आहे.४५८१ घरांपर्यंत पोहोचले आरोग्य कर्मचारीमिशन भामरागड अंतर्गत आरोग्य विभागाच्या पथकाने तालुक्यातील ४५८१ कुटुंबांपर्यंत जाऊन २४ हजार १२० नागरिकांची तपासणी केली. त्यात सर्दी, खोकला, तापाचे ४६३ रुग्ण आढळले. ८० रुग्ण हगवणीचे आढळले. ४८२ जणांचे रक्तनमुने घेण्यात आले. याशिवाय १०२ रुग्णांचे हिमोग्लोबिन तर ४८ जणांची लघवी तपासण्यात आली. ३३७ जणांचा रक्तदाब तपासण्यात आला. या भेटीदरम्यान अतितीव्र कुपोषित असे २६ बालक तर सर्वसाधारण कुपोषित १२५ बालक आढळले. त्यांनाही आवश्यक तो औषधोपचार देण्यात आला. याशिवाय १४४ गरोदर माता आणि ९४ स्तनदा मातांनाही तपासण्यात आले.डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्नया मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याची जागृती करण्यासोबतच डासांची उत्पत्ती वाढविणारे १२२३ पाणी साचलेले मोठे भांडे, ड्रम, टायर रिकामे केले. २९६७ ठिकाणी पाण्यात डासांची अळीनाशक टाकले. याशिवाय शेणाचे, कचºयाचे ढिग अशी डासांची उत्पत्तीची ठिकाणे शोधून तिथे डासनाशकाची फवारणी केली. १३९ ठिकाणच्या पाण्याच्या डबक्यांमध्ये गप्पी मासेही सोडण्यात आले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर