काेट
गडचिराेली जिल्ह्यात काेराेना काळात नैसर्गिक गर्भपाताचे प्रमाण वाढले नाही. उलट गेल्या तीन-चार वर्षांत नैसर्गिक गर्भपाताचे प्रमाण कमी झाले आहे. ग्रामीणपेक्षा शहरी भागात नैसर्गिक गर्भपात हाेत असल्याचे दिसून येते. नैसर्गिक गर्भपात हाेऊ नये, यासाठी आराेग्य विभागाच्यावतीने मार्गदर्शन व जनजागृती केली जात आहे.
- डाॅ. समीर बन्साेडे, जिल्हा माता व बालसंगाेपन अधिकारी, गडचिराेली
बाॅक्स
गर्भपाताची कारणे
जनुकीय यंत्रणेची बिघाड, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह, संप्रेरकांचे असंतुलन, जंतू संसर्ग, गर्भाशयातील विकृती, आहारात याेग्य अन्नघटकांचा अभाव, खूप शारीरिक कष्ट, मानसिक ताण, मद्यपान, तंबाखूचे सेवन आदींमुळे गर्भपात हाेऊ शकताे.
जिल्हाभरातील नैसर्गिक गर्भपात
वर्ष संख्या
२०१८-१९ ९२६
२०१९-२० ११९४
२०२०-२१ १३७०
२०२१ जूनपर्यंत ४६१