शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मिनी मंत्रालय करणार सहा लाख वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

राज्यात या अभियानांतर्गत २०२० ते २०२४ या पाच वर्षात प्रत्येक वर्षी १० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. त्यातील ५ कोटी वृक्ष लागवड वन विभागामार्फत तर ५ कोटी वृक्ष लागवड इतर विभागांमार्फत केली जाणार आहे. हरीत महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्यातून दुष्काळ, पाणी टंचाई आणि इतर नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन कार्यक्रम चळवळीच्या रुपात राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देहरित महाराष्ट्र अभियान : विविध विभागासह पंचायत समित्यांना उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या वन विभागामार्फत वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेला ६ लाख १८ हजार ५०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याची कामेही सुरू झाली आहेत. परंतू एवढी रोपे जिल्ह्यात उपलब्ध होण्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.राज्यात या अभियानांतर्गत २०२० ते २०२४ या पाच वर्षात प्रत्येक वर्षी १० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. त्यातील ५ कोटी वृक्ष लागवड वन विभागामार्फत तर ५ कोटी वृक्ष लागवड इतर विभागांमार्फत केली जाणार आहे. हरीत महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्यातून दुष्काळ, पाणी टंचाई आणि इतर नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन कार्यक्रम चळवळीच्या रुपात राबविला जाणार आहे. जि.प.ला मिळालेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सर्व विभागांना वाटून दिले. त्यात सर्वाधिक ४३ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट माध्यमिक शिक्षण विभागाला तर २३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राथमिक शिक्षण विभागाकडे आहे. याशिवाय महिला व बालकल्याण विभागाला ४०००, पंचायत विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मुख्य लेखा व वित्त विभाग आणि आरोग्य विभागाला प्रत्येकी ५००, बांधकाम विभाग, सिंचन विभाग, यांत्रिकी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाला प्रत्येकी ६५००, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला २०००, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला २३०० तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व स्वच्छ भारत मिशनला प्रत्येकी ५०० आणि समाज कल्याणला २०० चे उद्दिष्ट आहे. तसेच सर्व पंचायत समित्यांना प्रत्येकी ४२,४७५ वृक्ष लावायचे आहेत.रोपे आणणार कुठून?सदर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संबंधित विभागांना कळविल्यानंतर काही ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणे सुरू झाले आहे. परंतू एवढे रोपटे आणणार कुठून हा प्रश्न कायम आहे. राज्य शासनाकडून फेब्रुवारी ते मार्च यादरम्यान प्रधान सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या वेळोवेळी या वृक्ष लागवडीची कल्पना जि.प.च्या पंचायत विभागाला दिली आहे. परंतू पंचायत विभागाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोपट्यांची मागणी वनविभागाकडे केली. आता वेळेवर एवढी रोपटी वनविभाग कशी उपलब्ध करून देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग