शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी तंत्रज्ञानावर लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:24 IST

कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले कृषी तंत्रज्ञान, लागवडीच्या विविध पध्दती शेतकऱ्यांपर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. सन २०१८-१९ या वर्षात अशाच प्रकारचे कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआत्माचा उपक्रम : प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, अभ्यासदौरे, कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले कृषी तंत्रज्ञान, लागवडीच्या विविध पध्दती शेतकऱ्यांपर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. सन २०१८-१९ या वर्षात अशाच प्रकारचे कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी दरवर्षी शेतकरी प्रशिक्षण प्रात्यक्षिके, अभ्यासदौरे, कृषी प्रदर्शन आदींचे आयोजन करण्यात येते. याशिवाय मुद्रीत साहित्य तसेच ध्वनीचित्रफितीचा सुध्दा वापर करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाते.सन २०१८-१९ या वर्षात कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, मत्स्य व्यवसाय विभाग, पशुसंवर्धन, रेशीम संगोपन, दुग्ध व्यवसाय विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ आदी यंत्रणांनी सदर उपक्रमात सहभाग घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न केला.हे उपक्रम राबविण्यासाठी यंत्रणानिहाय शासकीय निधी अनुदानाच्या स्वरूपात वितरित करण्यात आला. यामध्ये कृषी विभागाला १ कोटी २४ लाख ३८ हजार, कृषी विज्ञान केंद्राला ६ लाख ४० हजार, मत्स्य व्यवसाय विभागाला ७ लाख ३९ हजार, पशुसंवर्धन विभागाला ४ लाख ४० हजार, दुग्ध व्यवसाय विकास विभागाला १३ लाख ८ हजार, रेशीम संगोपन विभागाला ८ लाख १८ हजार व महिला आर्थिक विकास महामंडळाला २ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या सर्व यंत्रणा मिळून एकूण १ कोटी ६२ लाख ८३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.धान उत्पादक शेतकºयांना प्रशिक्षणआत्मा गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय शेतीच्या स्वरूपात ३१ गट तयार करण्यात आले असून २ हजार २०० एकर क्षेत्रावर १ हजार ५५० शेतकऱ्यांद्वारे भारत सरकारच्या पीजीएस इंडिया प्रमाणे अंतर्गत सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन केले जात आहे. या शेतमालाच्या विपणनासाठी गोफ्स नावाची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतमालाचे मार्केटींग करण्यात येत आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा, प्रशिक्षणाचा कार्यक्रम सिक्कीम येथे करण्यात आले होते. संपूर्ण सेंद्रीय शेती राज्य या संकल्पनेवर गटात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.फेसबूक व युट्युब चॅनलद्वारेही जनजागृतीकृषी विभागाच्या विविध योजना, आत्मा कार्यालयाद्वारे शेतकºयांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम व इतर बाबींची माहिती कार्यालयीन फेसबूक व युट्युब चॅनलद्वारे नियमित प्रसारीत केली जात आहे. या माध्यमातून धान व इतर पिकांच्या लागवडीबाबत शेतकºयांना योग्य सल्ला दिला जात आहे.

टॅग्स :agricultureशेती