शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:14 IST

प्रवाशांच्या सोईसाठी अनेक बसथांब्यावर प्रवासी निवाºयाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु एकदा बांधकाम केल्यानंतर त्या प्रवासी निवाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या तालुक्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची जीर्ण व दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देदेसाईगंज तालुका : दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : प्रवाशांच्या सोईसाठी अनेक बसथांब्यावर प्रवासी निवाºयाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु एकदा बांधकाम केल्यानंतर त्या प्रवासी निवाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या तालुक्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची जीर्ण व दुरवस्था झाली आहे.तालुक्यातील कुरूड फाट्यावरील प्रवासी निवारा पूर्णपणे जीर्ण झाला असून छतावरील सिमेंट पत्र्यांना मोठे भगदाड पडले आहे. ऊन, वारा, पाऊस आणि थंडी यापासून प्रवाशांचे रक्षण व्हावे, यासाठी शासनाने हजारो रूपये खर्च करून गावोगावी प्रवासी निवारे बांधले. परंतु त्याच्या देखभालीची तरतूद केली नसल्याने बऱ्याच ठिकाणी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. कुरूड फाट्यावरील प्रवासी निवाऱ्याची अवस्था अतिशय बिकट असून पावसाळ्यात तो कधीही कोसळू शकतो. प्रवासी निवाऱ्याच्या छतावरील सिमेंट पत्रे पूर्णत: फुटले असल्याने येथे प्रवासी विश्रांती घेऊ शकत नाही. त्याचबरोबर पाठीमागील भिंत खालून पोखरलेली आहे. ती कधी कोसळेल, याचा नेम नाही. काही दिवसातच शाळा, महाविद्यालय सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ प्रवाशीच नाही तर विद्यार्थी सुद्धा शिक्षणासाठी ये-जा करताना प्रवासी निवाऱ्याचा आधार घेतात. परंतु देसाईगंज-आरमोरी, देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील अनेक प्रवासी निवाऱ्यांचीच दुरवस्था झाली असल्याने विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात कुठे आसरा घ्यावा, असा प्रश्न पडता आहे.संबंधित विभागाने किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रवासी निवाऱ्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरवर्षीच ही मागणी केली जाते. परंतु काहीच उपयोग होत नसल्याने रोष आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली