कृष्णनगरात कार्यक्रम : पालकमंत्र्यांच्या हस्ते कृष्ण मंदिरात पूजाचामोर्शी : श्री श्री राधाश्यामसुंदर मंदिर कृष्णनगर येथे ५ सप्टेंबर रोजी रात्री भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी अभिषेक व महापूजा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त नियोजन सभापती अतुल गण्यारपवार, भाजपचे ज्येष्ठ सदस्य बाबुराव कोहळे, ईस्कॉनचे चामोर्शी येथील अध्यक्ष परमेश्वरदास महाराज तसेच कृष्णनगर व पंचक्रोशितील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक परमेश्वरदास महाराज यांनी केले. संचालन रामानंददास व आभार बाबुराव कोहळे यांनी मानले. रविवारी सकाळपासूनच या मंदिरात भाविकांची श्रीकृष्ण दर्शनासाठी रिघ लागली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन जन्माष्टमी व गोपालकालानिमित्ताने करण्यात आले. रविवारी सकाळी या मंदिरात गडचिरोलीसह जिल्हाभरातून अनेक भाविकांनी रिघ लावली होती. चामोर्शीपासून दोन ते तीन किमी अंतरावर असलेल्या या मंदिर परिसरात धर्मशाळेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दोन दिवस श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा येथे साजरा करण्यात आला. दरवर्षीच या सोहळ्याला भाविकांची गर्दी जमते. (शहर प्रतिनिधी)
मध्यरात्री रंगला जन्मोत्सव सोहळा
By admin | Updated: September 7, 2015 01:32 IST