शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

गणरायाला भावपूर्ण निरोप...

By admin | Updated: September 17, 2016 02:37 IST

‘पुढल्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात मुंबईकरांनी लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवारी मोठ्या जल्लोषात निरोप दिला. बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजानेही दिवसभर कडक सलामी दिली

मुंबई : ‘पुढल्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात मुंबईकरांनी लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवारी मोठ्या जल्लोषात निरोप दिला. बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजानेही दिवसभर कडक सलामी दिली. पावसाच्या रंगात भक्तीचा रंग मिसळल्याने गुरुवारी सकाळी सुरू झालेले विसर्जन सोहळे शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होते.महिनाभर दडी मारलेल्या पावसाने बाप्पाला निरोप देण्यासाठी गुरुवारी जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सकाळी रस्त्यांवरील भक्तांची संख्या काहीशी कमी होती. मात्र मिरवणुकांना सुरुवात होताच, मुंबईकरांनी रस्त्यांवर गर्दी करायला सुरुवात केली. ३५ हजार पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये लाखो मुंबईकर गेट वे आॅफ इंडियापासून दादर, गिरगाव, जुहू चौपाट्यांसह प्रमुख विसर्जनस्थळांवर एकवटले होते.पावसाच्या व्यत्ययामुळे गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना काहीशा उशिराने सुरुवात झाली. गिरणगावातील माथाडींचा गणपती म्हणून ओळख असलेला ‘कॉटनग्रीनचा राजा’ने कॉटनग्रीनमार्गे लालबागमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ गणेश गल्लीमधील ‘मुंबईचा राजा’ आणि मग सकाळी ११ वाजता ‘लालबागचा राजा’ दरबारातून बाहेर पडला. या सर्व राजांच्या दर्शनासाठी सकाळी ७ वाजल्यापासूनच लालबाग परिसरात गणेशभक्तांनी गर्दी केली होती. परिसरातील इमारतींसोबतच दुकानांच्या छपरांचाही गणेशभक्तांनी ताबा घेतला होता. डीजेचा दणदणाट आणि ढोल-ताशांच्या गजरात शहरासह गुलालाची उधळण करत बाप्पाच्या मिरवणुका हळूहळू पुढे सरकत होत्या. स्थानिक मंडळांकडून अल्पोपाहार वाटप करत गणेशभक्तांची क्षुधा शांत करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याशिवाय अनेक ठिकाणी गणेशभक्तांसाठी पाण्याचे वाटपही केले जात होते. घोडपदेव, बकरी अड्डा, काळाचौकी आणि लालबाग येथील नयनरम्य पुष्पवृष्टी सोहळ्यांनी सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले. बाप्पाच्या डोक्यावर होणाऱ्या पुष्पवृष्टीपासून थेट गळ्यात जाणाऱ्या हाराने भक्तांच्या घोषणांनी बाप्पाचा निरोप सोहळा रात्रभर सुरू होता. (प्रतिनिधी)गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम चौपाटी, जुहू चौपाटी, खारदांडा, शिवडी जेट्टी, वेसावे जेट्टी, मढ-मार्वे जेट्टी, आरे कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज तलाव (शीतल तलाव), पवई तलाव, मुलुंड, भांडुप या मुख्य विसर्जनस्थळी २ लाख १० हजार ११८ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर कृत्रिम तलावांमध्ये ३० हजार ३५९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गतवर्षी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींची संख्या एकूण १ लाख ९२ हजार ३०८ इतकी होती तर कृत्रिम तलावांमधील विसर्जित गणेशमूर्तींची संख्या २५ हजार ४५३ होती.कपूर कुटुंबीयांची चाहत्यांना मारहाणबाप्पांचे विसर्जन होत असताना मुंबईत अभिनेते रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासह रणबीर कपूर यांनी पत्रकारांसह चाहत्यांना मारहाण केल्याची घटना घडली. आरके स्टुडिओच्या गणपती विसर्जनावेळी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारांनी हजेरी लावली. आरती झाल्यावर एका पत्रकाराने रणधीर यांना प्रतिक्रिया विचारली होती, मात्र रणधीर कपूर यांनी थेट पत्रकाराला मारहाण केली. तर ऋषी कपूर यांनीही सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याला मारहाण केली. पवई परिसरात वाहतूककोंडीअनंत चतुर्दशीच्या दिवशी पवई तलावातही मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मात्र हे विसर्जन दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू राहिल्याने पवई परिसरात मोठ्या वाहतूककोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला. त्याचा फटका थेट जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील वाहनांना बसला. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करण्यासाठी नेहमीपेक्षा किती तरी अधिक वेळ लागत होता. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत या परिसरात वाहतूककोंडी होती. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात बाप्पांचे विसर्जन निर्विघ्न पारमुंबई : किरकोळ घटना सोडल्यास मुंबईत बाप्पांचे विसर्जन निर्विघ्न पार पडले. पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. बाप्पांचे विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी पोलीस यंत्रणा गुड मॉर्निंग पथकांसह पहाटेपासूनच कामाला लागली होती. तब्बल ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा यावेळी बंदोबस्तासाठी तैनात होता. विसर्जनाच्या मुख्य ठिकाणांवर मुंबई पोलिसांनी वाहतूक पोलिसांबरोबर केलेल्या नियोजनामुळे यंदा वाहतूककोंडीचा फटका बसला नाही. दरम्यान, कुलाबा येथील रेडिओ क्लब येथे मध्य प्रदेशातून फिरायला आलेला देविश कनसिथीया (२६) समुद्राच्या काठावर बसला होता. अचानक तोल जाऊन तो खाली कोसळला. मात्र तेथे असलेल्या पोलिसांनी त्याची सुखरूप सुटका केली. चारकोप पोलीस ठाण्याचे पीएसआय नाईक यांनी रस्त्यावर दारुच्या नशेत झोपलेल्या गर्दुल्ल्याला हटकले. याच रागातून गर्दुल्ल्याने त्यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या किरकोळ घटना सोडल्यास विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडला.