शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

समस्यांसंदर्भात महिनाभरात मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावणार

By admin | Updated: April 6, 2015 01:35 IST

कुंभार समाजाच्या विकासासाठी मातीकला बोर्ड स्थापन व्हावे, तसेच कुंभार समाजाचा एन. टी. प्रवर्गात समावेश

कुंभार समाज मेळावा : अम्ब्रीशराव आत्राम यांचे आश्वासनगडचिरोली : कुंभार समाजाच्या विकासासाठी मातीकला बोर्ड स्थापन व्हावे, तसेच कुंभार समाजाचा एन. टी. प्रवर्गात समावेश होणे गरजेचे आहे. या दोन प्रश्नांसह कुंभार समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न कायम आहेत. कुंभार समाजाच्या समस्यांबाबत राज्यस्तरावर निर्णय होण्यासाठी कुंभार समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची महिनाभरात मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावणार, असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले. महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने लोकप्रतिनिधींचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कुंभार समाज मेळावा संस्कृती भवनात रविवारी घेण्यात आला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष संजय गाते होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, महासंघाचे सरचिटणीस सुभाष तेटवार, डॉ. सुनंदा जामकर, कल्याण कुंभार, शेषानंद पांडे महाराज, चंद्रकला चिकाणे, सदाशिव व्यवहारे, आशा बोरसरे, एकनाथ बुरबांदे, सुरेश पाठक, देवराव खोबरे, सूर्यभान वरवाडे, अनिल करपे आदी उपस्थित होते. याप्रसंगी कुंभार समाज महासंघाच्या वतीने पालकमंत्री आत्राम खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खा. अशोक नेते म्हणाले, कुंभार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांकडे तत्कालीन राज्य व केंद्र सरकारचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कुंभार समाज विकासापासून दूर राहिला. कुंभार समाजाचा समावेश एन. टी. प्रवर्गात होण्यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू, असे सांगितले. याप्रसंगी कुंभार समाजातील इयत्ता दहावीतील व पदवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये पायल संजय रामगुंडेवार, पल्लवी भक्तदास खोबरे, अंकित अशोक बुरबांदे, आशिष दिलीप गुंडरे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंभार समाज महासंघाचे सरचिटणीस सुभाष तेटवार, संचालन लीलाधर पाठक, किशोर बुरबांदे यांनी केले तर आभार ताराचंद कोटांगले यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खा. अशोक नेते यांना कुंभार समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील कुंभार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष संजय रामगुंडेवार, उपाध्यक्ष गोपाळराव खोबरे, दिलीप ठाकरे, किशोर बुरबांदे, नरेंद्र ठाकरे, ताराचंद कोटांगले, रवींद्र गिरोले आदींनी सहकार्य केले. पालकमंत्र्यांनी दाखविली माणुसकीगडचिरोली येथे कुंभार समाजाच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम अहेरीवरून निघाले. दरम्यान आष्टी, चामोर्शी मार्गावर गणेश साळवे व त्यांच्या पत्नीचा दुचाकीने अपघात घडला. पालकमंत्री आत्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी गाड्यांचा ताफा थांबविला. जखमी झालेल्या गणेश साळवे यांच्या पत्नीला आपल्या वाहनात बसवून आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. योग्य औषधोपचार करण्याचे निर्देशही तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले. त्यानंतर ते गडचिरोली येथे कुंभार समाजाच्या मेळाव्याला उपस्थित झाले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गेडाम, श्रीनिवास मगडीवार, संजय पाणगुडे आदी उपस्थित होते. कुंभार समाजाच्या हक्कासाठी व विकासासाठी समाज बांधवांनी संघटीत राहावे, कुंभार समाजातील युवकांना रोजगार देण्याचा निश्चितच प्रयत्न करू.- अम्ब्रीशराव आत्राम, पालकमंत्री, गडचिरोली