शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्लीत राष्ट्रवादी काँगे्रसचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:56 IST

आलापल्ली येथील राणी दुर्गावती शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. अध्यक्षा तथा विद्यमान जि.प.चे बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राकाँचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, अहेरी पं.स. सदस्य हर्षवर्धन आत्राम,......

ठळक मुद्देअनेक कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश : धर्मरावबाबा आत्राम यांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आलापल्ली येथील राणी दुर्गावती शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. अध्यक्षा तथा विद्यमान जि.प.चे बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राकाँचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, अहेरी पं.स. सदस्य हर्षवर्धन आत्राम, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष रिंकू पापडकर, अहेरी तालुकाध्यक्ष जहीर हकीम, इरफान खान, शैलेश पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून पुढे बोलतांना माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, पक्षातून काही कार्यकर्ते निघून गेले असतील तर जावू द्या, पण निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकमेकांचे हेवेदावे बाजूला सारून आता पासूनच कामाला लागावे. असे आवाहन केले. माजी आमदार दीपक आत्राम व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवून सत्तारुढ भाजपा पक्षावर सडकून टीका केले.याप्रसंगी बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी खास करून महिलांमध्ये एकजुटीची मोठी ताकद असून या ताकदीचा व नारीशक्तीचा उपयोग मिशन २०१९ मध्ये करावा. पक्षाला मजबूत करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रवी वासेकर यांनी तर संचालन गजानन लोनबले यांनी केले. मेळाव्यात अनेक महिला, युवक, युवतींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या मेळाव्याला आलापल्ली, नागेपल्ली व परिसरातील राकाँचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.