तेली समाजाचा परिचय मेळावा : डंबोळे यांचा सपत्नीक सत्कार अहेरी : तेली समाज मित्र मंडळ अहेरी-आलापल्लीतर्फे तेली समाज बांधवाचा परिचय मेळावा स्थानिक मद्दीवार प्राथमिक शाळेत नुकताच संपन्न झाला. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार सी. एल. किरमे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेश डंबोळे, प्रकाश दुधबावरे, नगरसेवका हर्षा ठाकरे, प्राचार्य पोटदुखे, प्रा. सुधीर गुळघाने, बंडू भांडेकर, हरीभाऊ भांडेकर, प्रकाश तरारे उपस्थित होते. नातू फाऊंडेशनने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल डॉ. सुरेश डंबोळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. महिलांकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच महीला, पुरुष व मुलांसाठी विविध बौद्धिक व शारीरिक खेळ, नृत्य व अभिनय स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. प्रस्ताविक ताराचंद भुरसे, संचालन राजू सोनटक्के तर आभार योगेश धोडरे यांनी मानले. मुकेश भांडेकर, सुरेश सातपुते, राजू सोनटक्के यांनी सहकार्य केले.
विविध स्पर्धांनी मेळावा उत्साहात
By admin | Updated: February 2, 2017 01:31 IST