शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बंजारा समाजाचा मेळावा उत्साहात

By admin | Updated: January 26, 2017 02:11 IST

बंजारा समाजाच्या वतीने शहरात स्नेहमिलन मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात

गडचिरोली : बंजारा समाजाच्या वतीने शहरात स्नेहमिलन मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात विविध स्पर्धा घेऊन यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वाशिम येथील प्रमिला आडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शशिकला राठोड, सुलोचना आडे, ललीता राठोड, रविता लावडे उपस्थित होत्या. मेळाव्यात संगीत खुर्ची वन मिनीट गेम घेण्यात आला. मुलांच्या संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक चेतन विनय चव्हाण, द्वितीय क्रमांक वैैष्णवी पवार, वन मिनीट गेममध्ये प्रथम क्रमांक प्रज्ज्वल गुगलोत, द्वितीय क्रमांक चेतन चव्हाण यांनी पटकाविला. महिलांच्या संंगीत खुर्चीमध्ये प्रथम प्रीती पवार, द्वितीय क्रमांक जयश्री पवार, वन मिनीट गेम मध्ये प्रथम प्रीती पवार, द्वितीय क्रमांक सामका राठोड यांनी पटकाविला. समाजाने आपली संस्कृती जोपासत आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे, असे आवाहन प्रमिला राठोड यांनी केले. तर महिलांनी कौंटुबिक व सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन प्रा. संतोष आडे यांनी केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विकास चव्हाण, सचिव वसंत पवार, प्राचार्य चव्हाण यांचा बचत गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विकास चव्हाण, संचालन प्रा. विजया चव्हाण तर आभार किशोर चव्हाण यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)