शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

गटाच्या माध्यमातून यांत्रिक शेती

By admin | Updated: November 29, 2014 23:21 IST

शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच यांत्रिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १ हजार ४५१ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून शेतकरी गटांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होऊ लागला

गडचिरोली : शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच यांत्रिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १ हजार ४५१ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून शेतकरी गटांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होऊ लागला असल्याने शेतकरी गटांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. या शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती कसण्यासाठी आवश्यक असलेली साहित्य खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे मनुष्यबळाच्या भरवशावरच शेती केल्या जाते. परिणामी पिकांची लागवड वेळेवर होत नसल्याने उत्पादनात कमालीची घट येत होती. महाराष्ट्रातील सहकार चळवळीने प्राप्त केलेले यश बघून सहकार चळवळीच्या धर्तीवर शेतकऱ्यांचे बचतगट स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार राज्यभर शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातही कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यांतर्गत सुमारे १ हजार ४५१ शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. या शेतकरी गटांमध्ये १५ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग आहे. स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटांना सुलभ कर्ज पुरवठा, मजुरांची उपलब्धता, पेरणी ते काढणीपर्यंत आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्या जाते. त्याचबरोबर समुहशक्तीच्या बळावर ती खरेदी करणेसुध्दा शक्य झाले आहे. शेतकरी गटातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने आवश्यक ते प्रशिक्षण, कौशल्यवृध्दी, शेतकरी अभ्यास दौरे, प्रक्षेत्र भेट, शास्त्रज्ञ मार्गदर्शन, शेतमाल उत्पादन, शेतीवर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी विशेष सहकार्य केले जात आहे. चालू वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरूवातीला मानव विकास मिशन अंतर्गत ३७ व आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने १६ गट असे एकूण ५३ गट स्थापन करण्यात आले. या गटांना भात रोवणी यंत्र, पॉवर ट्रिलर, युरीया ब्रिकेट अप्लीकेटर व रिपर आदी साहित्य पुरविण्यात आले आहेत. इतरही गटांना लहान मोठी कृषी अवजारे पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे यांत्रिक पध्दतीने शेती करण्यास शेतकऱ्यांना फार मोठा हातभार लागत आहे. शेतीपुरक व्यवसाय म्हणून लाख शेती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची या तालुक्यांमध्ये ८० गट स्थापन करण्यात आले आहेत. (नगर प्रतिनिधी)