शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:42 IST

एका अपघातानंतर बंद झालेले सुरजागड पहाडावरील लोहखनिजाच्या उत्खननाचे काम पूर्ववत सुरु करण्याच्या आश्वासनानंतर गुरूवारी तिसऱ्या दिवशी मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आरंभिलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देआमदारांची भेट : लोहखनिज उत्खननाचे काम सुरू करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एका अपघातानंतर बंद झालेले सुरजागड पहाडावरील लोहखनिजाच्या उत्खननाचे काम पूर्ववत सुरु करण्याच्या आश्वासनानंतर गुरूवारी तिसऱ्या दिवशी मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आरंभिलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आले.लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीद्वारे सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु होते. परंतु १६ जानेवारीला गुरुपल्ली गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाºया एका ट्रकने बसला चिरडल्याने चार जण ठार झाले. या अपघातानंतर अचानक लोहखनिज उत्खननाचे काम बंद करण्यात आले. यामुळे शेकडो मजुरांच्या हातचे काम हिरावले गेले. त्यानंतर काम सुरु करण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांना मजुरांनी एक पत्र दिले होते. काम सुरु न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही मजुरांनी दिला होता. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने अनेक मजुरांनी ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण होते.अखेर गुरूवारी आ.डॉ.देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, लॉयड मेटल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी लवकरात लवकर लोहखनिज उत्खनन सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मजुरांनी उपोषणाची सांगता केली.सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु करण्यास लॉयड मेटल्स कंपनी व प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे. या कामातून स्थानिक नागरिकांना रोजगार देण्याचे कंपनीचे धोरण आहे. सोबतच कोनसरी येथील प्रकल्पही सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रशासनातर्फे कार्यस्थळी पुरेशी सुरक्षा मिळाल्यास महिन्यातून २५ दिवस उत्खननाचे कार्य सुरु ठेवता येईल व त्यामुळे मजुरांना २५ दिवस रोजगार मिळेल, असे लॉयड मेटल्स कंपनीचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळी