शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूती रजा वेतन प्रस्ताव प्रलंबित

By admin | Updated: November 1, 2014 00:54 IST

शासनाच्यावतीने महिला कर्मचाऱ्यांना गरोदरपणा व प्रसूतीकाळासाठी सहा महिने म्हणजे १८० दिवसाच्या भर पगारी रजा दिल्या जातात. जिल्हाभरात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.

गडचिरोली : शासनाच्यावतीने महिला कर्मचाऱ्यांना गरोदरपणा व प्रसूतीकाळासाठी सहा महिने म्हणजे १८० दिवसाच्या भर पगारी रजा दिल्या जातात. जिल्हाभरात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र प्रसूत रजा घेतलेल्या अनेक महिलांचे प्रसूती रजा प्रस्ताव मंजूर करण्यात न आल्याने या महिला कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे प्रसूत रजेचा अर्ज केल्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रसूत रजा मंजूर व्हायला पाहिजेत. मात्र जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या प्रशासकीय दिरंगाईमुळे गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून प्रसूत रजा प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे. प्रसूत रजा घेतलेल्या महिला कर्मचारी रजा संपल्यानंतर सेवेमध्ये रूजू झाल्या आहेत. सेवेत रूजू होऊन दोन ते तीन महिन्याचा कालावधी लोटत आहे. मात्र या महिला कर्मचाऱ्यांचे प्रसूत काळातील वेतन अद्यापही काढण्यात आले नाही. त्यामुळे या महिला कर्मचारी तसेच त्यांचे नातेवाईक जिल्हा परिषदेच्या विविध विभागात वारंवार चकरा मारत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे आरोग्य व शिक्षण विभागात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक परिचारिका तसेच शिक्षिकांनी प्रसूत रजा घेतल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी रजेवर जातांनाच अर्ज व प्रस्ताव संबंधीत विभागाकडे सादर केला आहे. मात्र रजा उपभोगून सेवेत रूजू झाल्यानंतरही या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसूत रजा मंजूर करण्यात आल्या नाही. त्यामुळे अनेक महिला कर्मचाऱ्यांना प्रसूत रजा काळातील वेतन अद्यापही मिळाले नाही. जिल्हा परिषदेमध्ये विविध विभाग आहेत. यापैकी आरोग्य व शिक्षण विभागाकडे प्रसूत रजेचे अनेक महिला कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव पडून असल्याची माहिती आहे. जि. प. च्या आरोग्य व शिक्षण विभागात प्रसूत रजेच्या वेतन प्रस्तावासाठी दररोज अनेक महिला कर्मचारी तसेच त्यांचे नातेवाईक येत असल्याचे दिसून येते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)