गडचिरोली : गडचिरोलीचे भाजप आमदार डॉ. देवराव होळी व गडचिरोलीचे तलाठी अजय तुंकलवार यांच्यात समेट होऊन दोघांनीही एकमेकांच्या विरोधातील तक्रारी मागे घेतल्या. मात्र गेल्या आठवडाभर तलाठ्यांनी काम बंद आंदोलन करून शेतकरी, विद्यार्थी, पालक यांना वेठीस धरले. या लोकांना अत्यंत गरजेचे काळात वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध झाली नाही. तलाठी संघटनांनी जिल्हाभर आंदोलन छेडून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम केले. आमदार व तलाठी संघटना यांच्या या वादात सामान्य जनता भरडल्या गेली, अशी प्रतिक्रिया गडचिरोली शहर काँग्रेस कमिटीने व्यक्त केली आहे. प्रकरण आपसात मिटवायचे होते, तर तलाठ्यांनी तक्रार का मागे घेतली, असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला असून आमदार व तलाठी संघटना यांच्याकडून जनतेची दिशाभूल करण्यात आली, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.
आमदार व तलाठ्यांच्या भांडणात जनतेला फटका
By admin | Updated: June 15, 2016 02:13 IST