शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मार्र्कं डात उसळणार जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:04 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रासह तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील हजारो भाविक येणार आहेत.

ठळक मुद्दे१३ फेब्रुवारीपासून यात्रा : प्रशासनाच्या वतीने विविध सोयीसुविधा राहणार

संतोष सुरपाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रासह तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील हजारो भाविक येणार आहेत. येथील वैनगंगेच्या पात्रात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.मार्र्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असते. यंदा एक महिन्यापूर्वी महाशिवरात्रीचे पर्व येत असून यात्रा भरणार आहे. १३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यात्रेतील भाविकांसाठी प्रशासनाच्या वतीने विविध सोयीसुविधा तसेच उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्याचे कामही प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे बसगाड्यांची व्यवस्था करण्यात येणार असून चामोर्शी पोलीस ठाण्यातर्फे तगडा बंदोबस्त राहणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची चमू सक्रिय झाली असून चाचपणी सुद्धा करण्यात आली आहे. स्थानिक व फराडा, मोहुर्ली, रामाळा, घारगावकडे जाणाऱ्या भाविकांना मार्ग उपलब्ध आहे. मात्र मंजूर असलेल्या या कामाची दुरूस्ती न झाल्याने नागरिकांकडून प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त केली जात आहे. मार्गाच्या कामासाठी निधीही प्राप्त झाल्याची माहिती आहे.जल, जंगल, जमिनीवर ग्रामपंचायतीचा अधिकार असतो,. परंतु यात्रेतील संपूर्ण कर वसुली पंचायत समिती प्रशासन वसूल करीत असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे संपूर्ण यात्रेची कर वसुली करण्याचे अधिकार मार्र्कंडादेव ग्रा.पं.ला द्यावे, अशी चर्चा ग्रा.पं. पदाधिकारी करीत आहेत. मार्र्कंडादेव येथील कर नाका बंद केल्याने लाखो रूपयांचा कर बुडाला आहे.