शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित क्षेत्रात यापुढे अनेक पदांवर स्थानिक आदिवासींचीच भरती होणार

By admin | Updated: June 14, 2014 23:33 IST

राज्यातील अनुसूचित क्षेत्रात यापुढे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य व कृषी कर्मचारी आदी पदे स्थानिक आदिवासी समाजातील उमेदवारामधून भरली जातील, असा महत्वपूर्ण निर्णय राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी

गडचिरोली : राज्यातील अनुसूचित क्षेत्रात यापुढे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य व कृषी कर्मचारी आदी पदे स्थानिक आदिवासी समाजातील उमेदवारामधून भरली जातील, असा महत्वपूर्ण निर्णय राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागातील आदिवासी तरूणांना अनुसूचित क्षेत्रातील नोकऱ्यासाठी दावा करता येणार नाही. राज्यात अनुसूचित क्षेत्रात १५ जिल्ह्यांचा समावेश आहे. परंतु या भागाचा अजुनही पुरेसा विकास झालेला नाही. या विभागातील मानव विकास निर्देशांक व सामाजिक निर्देशांक राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. कर्मचाऱ्याची पदे रिक्त राहणे, सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती कमी असणे, कर्मचाऱ्यांना स्थानिक बोलीभाषा अवगत नसणे या आणि इतर कारणांमुळे शिक्षण, आरोग्य व इतर सेवांपासून आदिवासी समाज अजुनही वंचित राहिला आहे, असे आढळून आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार परिषदेनेही आदिवासी समाजाच्या विविध समस्या राज्यपालांच्या निर्देशनास आणून दिल्या होत्या. राज्य सरकारच्या विविध विकासाच्या योजना प्रभावीपणे आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी काही शासकीय पदे जी स्थानिक आदिवासीमधूनच भरली जावीत, अशी शिफारस परिषदेने राज्यपालांना केली होती. त्यानुसार घटनेच्या पाचव्या अनुसूचीद्वारे प्राप्त झालेल्या विशेषाधिकारांचा वापर करून राज्यपालांनी तलाठी, ग्रामसेवक, सर्व्हेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास निरिक्षक, कृषी सहाय्यक, पशुधन सहाय्यक, परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यासह गट क आणि ड वर्गातील समकक्ष पदे अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक आदिवासी उमेदवारांमधूनच भरण्यात येतील, असा निर्णय घेतला व तशी अधिसूचना जारी करण्यात आली. राज्यपालांनी अशा प्रकारच्या घटनात्मक विशेष अधिकाराचा पहिल्यांदाच वापर केला असून या निणर्यामुळे आदिवासींच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात या निर्णयामुळे इतर मागास प्रवर्ग समाजातील उमेदवारांचे नोकरीचे दार बंद होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आधीच ओबीसी समाजाला आरक्षणात कपात झाल्याने मोठा फटका बसला आहे. त्यात आता नवा निर्णय झाल्याने आता तर इतर मागासवर्गीयांचा असंतोष वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)