शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अनेक कुटुंब रंगले दारूच्या धंद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2015 01:27 IST

१९९३ मध्ये दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता संपूर्ण कुटुंब अनेक ठिकाणी दारूच्या अवैध व्यवसायात गुंतले असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

पोलिसांच्या धाडसत्रात झाले उघड : दारूबंदी जिल्ह्यातील विदारक वास्तवगडचिरोली : १९९३ मध्ये दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता संपूर्ण कुटुंब अनेक ठिकाणी दारूच्या अवैध व्यवसायात गुंतले असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये पती, पत्नी, मुलगा हे सारे दारूच्या व्यवसायात गुंतले. धाडीदरम्यान काही अख्या कुटुंबावरच पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले असल्याचाही प्रकार उघडकीस आला.गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी करण्यात आली. मात्र या दारूबंदीची कडक अंमलबजावणी पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून करण्यात आली नाही. त्यामुळे गावागावात दारूचा व्यवसाय फोफावत राहिला व या अवैध व्यवसायात आज १० हजारावर अधिक लोक गुंतलेले आहे. युवकांपासून वयोवृध्द व महिला या सर्व घटकांचा या अवैध धंद्यांत सहभाग आहे. अत्यंत कमी मेहनतीत बनावट कंपन्यांची दारू या लोकांमार्फत जिल्ह्यातील तसेच परप्रांतातील दारू तस्कर पोहोचवित आहे. या अवैध दारू व्यवसायात जिल्ह्यातील अनेक खेड्यात अख्ख कुटुंबच काम करीत असल्याची माहिती पोलिसांच्या धाडसत्रातून पुढे आली आहे. १ एप्रिलपासून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी विशेष पथकामार्फत अंमलबजावणी यंत्रणा सक्रीय केली. त्यांनी धाड घालून कारवाई प्रारंभही केली. अनेक ठिकाणी वडील, मुलगा, आई यांच्यावर दारूच्या अवैध विक्री प्रकरणात कारवाई करण्यात आली. या कुटुंबांकडून मोठ्या प्रमाणावर दारू विक्री करण्यात येत असल्याचे पोलिसांनाही आढळून आले. पती, पत्नी दोघेही दारू व्यवयात सक्रीयरित्या काम करून या अवैध धंद्यातून अनेक व्यवसायिकांनी चारचाकी, दुचाकी वाहने खरेदी केले. मोठे घरही बांधले, अशी माहिती आता पुढे येऊ लागली आहे. जिल्ह्यातील मोठ्या गावांच्या पॉश वस्त्यांमध्येही दारूचा अवैध व्यवसाय महिलांच्या मार्फत त्यांचे कुटुंबीय चालवितात. ही माहितीही पुढे आली आहे. वैरागड गावात अलिकडेच मुलगा, वडील व पत्नी या तिघांवरही पोलिसांनी कारवाई केली. पती, पत्नीवर आतापर्यंत बऱ्याच प्रकरणात कारवाई झालेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)अवैध दारू विक्रीची १६० प्रकरणे दाखल३ आॅगस्ट २०१५ पर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचे १६० प्रकरणे दाखल केले आहेत. यात ३५८ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २७१ पुरूष, ८७ महिला यांचा समावेश आहे. यांच्याकडून ९३ लाख ९७ हजार ५६० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. नऊ चारचाकी वाहने तर १९ दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहे. यातील बहुतांशी वाहने ही दारू विक्रेत्यांनी स्वत: खरेदी केलेली आहेत. या गुन्ह्यांमध्ये पती, पत्नी आरोपी असलेले जवळजवळ ६० टक्के गुन्हे आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात काम करते. हे ही पोलिसांना दिसून आले आहे. ही सामाजिक दृष्टिकोनातून योग्य बाब नसल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.