शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोग्य सेवेत नियमित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 14:58 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आदिवासीबहुल १६ जिल्ह्यात मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी तत्वावर सेवा देत असलेल्या २८१ डॉक्टरांना नियमित आरोग्य सेवेत सामावून घेतले जाणार आहे.

ठळक मुद्देआरोग्य अभियान आयुक्तांचा प्रस्तावआदिवासीबहुल जिल्ह्यात देत आहेत सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आदिवासीबहुल १६ जिल्ह्यात मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी तत्वावर सेवा देत असलेल्या २८१ डॉक्टरांना नियमित आरोग्य सेवेत सामावून घेतले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य सेवा व अभियान आयुक्त डॉ.अनुपकुमार यादव यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिला आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या माता आणि ० ते ६ वयोगटातील बालकांना पाडास्तरावर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १९९५ पासून नवसंजीवनी कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठी बीएएमएस वैद्यकीय पदवीधरांना मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी तत्वावर नियुक्त केले आहेत. सद्य:स्थितीत १६ जिल्ह्यांमध्ये २८१ मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील भरारी पथके आदिवासीबहुल भागात बालकांसह आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा देत आहेत.त्यांना नियमित आरोग्य सेवेत सामावून घेण्याबाबत लोकप्रतिनिधींमार्फत अनेक वेळा तारांकित प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. याबाबत शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारसीनुसार नवसंजीवनी योजनेखालील सदर पदे कायमस्वरूपी निर्माण करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला. मात्र या पदाचे सेवा प्रवेश नियम ठरल्याशिवाय आणि मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय झाल्याशिवाय शासनाला प्रस्ताव पाठवू नये, असे सूचविले होते.दरम्यान गेल्या ५ मार्च २०२० रोजी झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत वैद्यकीय अधिकारी (गट-ब) या संवर्गातील पदे निर्माण करून त्या पदांवर सध्या कार्यरत मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार भरारी पथके ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे, त्या केंद्राच्या मुख्यालयी तिसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद निर्माण करण्याचे आयुक्तांनी प्रस्तावित केले आहे.आरोग्य केंद्रांवरील ताण कमी होणारमानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित सेवेत घेतल्यानंतर त्यांचे काम आदिवासी भागातील उपकेंद्रस्तरावर निर्माण केल्या जात असलेल्या वर्धिनी केंद्रातील कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपविले जाणार आहे. अशा पध्दतीने आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद निर्माण करून या केंद्रावरील कामाचा आणि पर्यवेक्षणाचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स :docterडॉक्टर