शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी तालुक्यात मलेरियाचे थैमान

By admin | Updated: November 26, 2014 23:05 IST

चामोर्शी तालुक्यात डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. त्यापाठोपाठ आता संपूर्ण तालुक्यात मलेरिया रोगाने थैमान घातले असून येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यात डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. त्यापाठोपाठ आता संपूर्ण तालुक्यात मलेरिया रोगाने थैमान घातले असून येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. २६ नोव्हेंबरपूर्वी चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात ४४ रूग्ण दाखल होते. २६ नोव्हेंबर रोजी या रूग्णालयात नव्याने २६ रूग्ण दाखल झाले. यात ४४ रूग्णांमध्ये २० रूग्ण मलेरियाग्रस्त आहे. आज बुधवारी ग्रामीण रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांमध्ये संजित बिश्वास (३५), निलेश वैरागी (२), रेवा शांती शील (५०), शुबेन हालदार (१९), यशोदा हालदार (५०), रायलक्ष्मी बिश्वास (३०), निर्माण माझी (२७), तपन मंडल (३४) सर्व रा. विकासपल्ली यांचा समावेश आहे. या रूग्णालयात सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. देवरी हे एकमेव डॉक्टर कार्यरत असून ते दिवसरात्र येथील रूग्णांवर औषधोपचार करीत आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागदेवते यांना शासकीय आदेशानुसार विविध ठिकाणी दौरे करावे लागतात. त्यामुळे एकट्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर संपूर्ण रूग्णालयाच्या आरोग्य सेवेचा भार पडला आहे. चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी व एक वैद्यकीय अधीक्षकांचे पद मंजूर आहेत. यापैकी सद्य:स्थितीत या रूग्णालयात केवळ प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. या रूग्णालयात दररोज २५० ते ३०० रूग्ण तपासणीसाठी बाह्य रूग्ण विभागात येत असतात. बाह्य रूग्ण विभागात येत असलेल्या रूग्णांमध्ये अधिकाधिक रूग्ण संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असल्याने त्यांना त्यांची तपासणी करणे एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणीचे जात आहे. चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात तत्काळ दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. याशिवाय या रूग्णालयात अपघातग्रस्त रूग्णांची भर पडत असल्याने रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. या रूग्णालयाच्या आरोग्य सेवेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)