शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

पीक कापणी प्रयोग अचूक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पीक कापणी प्रयोगानंतर प्राप्त होणारी सरासरी उत्पन्नाची आकडेवारी अचूक व विहित वेळेत प्राप्त होईल, यादृष्टीने कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या निर्देशानुसार पीक विमा योजनेच्या अनुषंगाने करावयाच्या पीक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : महसूल, जि. प. व कृषी विभागाच्या कर्मचाºयांचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पीक कापणी प्रयोगानंतर प्राप्त होणारी सरासरी उत्पन्नाची आकडेवारी अचूक व विहित वेळेत प्राप्त होईल, यादृष्टीने कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या निर्देशानुसार पीक विमा योजनेच्या अनुषंगाने करावयाच्या पीक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. याप्रसंगी जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील पिकांचे विविध नैैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोगान्वये प्राप्त होणारी सरासरी उत्पन्नाच्या माहितीचा वापर होतो. त्याकरिता पीक कापणी प्रयोग महसूल, जि. प. कृषी विभागाने अचूकपणे करावा, अशा सूचना प्रशिक्षणार्थींना दिल्या.यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशो चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, कृषी उपसंचालक धनश्री जाधव यांच्यासह जिल्ह्यातील महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पीक कापणी प्रयोगाबाबत विचार व्यक्त करून या प्रयोगाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगाचे नियोजन व तांत्रिक प्रशिक्षण तंत्र अधिकारी (सांख्यिकी) सचिन देवरे यांनी केले. प्रशिक्षणाचे आभार तंत्र अधिकारी सचिन देवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.गावस्तरीय समित्यांना मिळणार प्रशिक्षणपीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून अचूक पीक उत्पादनाची सरासरी व नुकसान माहिती व्हावे, यादृष्टीने पीक कापणी प्रयोगाच्या गावस्तरीय समितीचे प्रशिक्षण तालुकास्तरावर आयोजित करावे तसेच गावस्तरीय समिती सदस्यांना पिकाच्या कापणीवेळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत क्षेत्रीय कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या.