शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयस्तरावर नावलौकिक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:32 IST

दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी खेळाडूंमध्ये उपजत क्रीडा कौशल्य आहे. या प्रतिभासंपन्न आदिवासी खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाची गरज आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : रांगीत आश्रमशाळा प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी खेळाडूंमध्ये उपजत क्रीडा कौशल्य आहे. या प्रतिभासंपन्न आदिवासी खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीयस्तरावर पोहोचण्यासाठी खेळाडूंनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, गडचिरोली कृउबासचे मुख्य प्रशासक शशिकांत साळवे, रांगीचे सरपंच जगदीश कन्नाके, उपसरपंच नरेंद्र भुरसे, पोलीस पाटील रामचंद्र काटेंगे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, वंदना महले, शाळा समितीचे अध्यक्ष जांबुवंत पेंदाम आदी उपस्थित होते.डॉ. सचिन ओंबासे यांनी आश्रमशाळेत क्रीडा मार्गदर्शकांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली असून याचा फायदा खेळाडूंनी घ्यावा. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञान व क्रीडागुणांमध्ये भर घालण्यासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या जात आहेत, असे प्रास्ताविकेतून सांगितले.याप्रसंगी गडचिरोली येथील इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या मुलींनी तसेच रांगी येथील आश्रमशाळेच्या मुला-मुलींनी नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. कार्यक्रमाचे संचालन क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर व अनिल बारसागडे यांनी केले. तर आभार आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुरेश पिलारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल सोमनकर, सुधीर शेंडे, धनंजय वाणी, किशोर येळणे, प्रेमिला दहागावकर, व्ही. जी. चाचरकर, प्रमोद वरगंटीवार, सतीश पवार, सुधीर झंझाळ, सुभाष लांडे, अनिल सहारे, विनोद चलाख, एम. जी. मैंद, विनायक क्षीरसागर, पुरूषोत्तम भोयर, संदीप बिसेन, अनिल रामटेके, चंदा कोरचा, योगीता बिसेन व प्रकल्पाचे कर्मचारी व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी