शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

जांभूळ व रानमेवाची बाजारपेठ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:21 AM

७८ टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारचे वनोपज उपलब्ध आहे. या जिल्ह्यातील जांभूळ, रानमेवा व रानभाजी राज्यभरात पोहोचले आहे. रानमेवा व जांभूळाची स्थानिक लोकांकडून मोठी मागणी आहे.

ठळक मुद्देकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचे प्रतिपादन : जांभूळ व रानमेवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ७८ टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारचे वनोपज उपलब्ध आहे. या जिल्ह्यातील जांभूळ, रानमेवा व रानभाजी राज्यभरात पोहोचले आहे. रानमेवा व जांभूळाची स्थानिक लोकांकडून मोठी मागणी आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून सदर उत्पादनासाठी व्यासपीठ बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. जांभूळ व रानमेव्याची बारजारपेठ उपलब्ध होण्याकरिता प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र सोनापूर व आत्मा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक कमलकेशव सभागृहात बुधवारी जांभूळ व रानभाजी महोत्सव पार पडला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणूून अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.पी.आर.कडू, अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ.आर.पी. सिंग, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जि.प.सदस्य अतुल गण्यारपवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.डी.अमरशेट्टीवार, प्रेस क्लबचे अध्यक्ष अरविंद खोब्रागडे, माविमचे जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, डॉ. शालिनी बडगे, शास्त्रज्ञ भूषण केवाटे, डॉ.संदीप कºहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिवरकर आदी उपस्थित होते.पुढे बोलताना कुलगुरू डॉ.भाले म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील जर्मप्लाझमचे संवर्धन व मूल्यवर्धन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यातील गौणउपज यावर प्रक्रिया झाल्यास शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होईल, असा आशावादही डॉ.भाले यांनी यावेळी व्यक्त केला.जि.प.सदस्य अतुल गण्यारपवार यांनी गौण उपवनजाच्या मूल्यवर्धनासाठी कंपनी स्थापन होण्याची गरज आहे. जेणे करून उत्पादनातून स्थानिक नागरिकांना अधिक आर्थिक लाभ होईल, असे सांगितले. जि.प. सदस्य योगीता भांडेकर यांनी जांभूळ व रानभाज्या यांचे आहारातील महत्त्व शहरातील नागरिकांना कळले पाहिजे, असे सांगितले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकरी राजेंद्र काळबांधे, मुखरू देशमुख, किसन कर्मकार, महादेव त्रिभाके, एकनाथ अंबादे यांना विविध वाणाच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदीप कऱ्हाडे, संचालन अधिष्ठाता योगीता सानप यांनी केले तर आभार डॉ.तारू यांनी मानले. सदर महोत्सवाला जिल्ह्यातील दुर्गम भागातील महिला बचतगट, शेतकरी गटाच्या महिलांसह कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर जांभूळ व रानभाजी महोत्सवात कृषी विज्ञान केंद्र, माविम अंतर्गत महिला बचतगट व इतर शेतकरी महिलांचे मिळून एकूण ४० स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्या ठेवण्यात आल्या होत्या. तसेच विविध प्रकारचे जांभूळ व इतर पदार्थ ठेवण्यात आले होते. सदर प्रदर्शनीला गडचिरोलीतील नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती व विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाहणी केली. अनेकांनी स्टॉलवर ठेवण्यात आलेल्या पदार्थांचा आस्वादही घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.