शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी देणारा जिल्हा निर्माण करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:16 IST

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ निर्मितीच्या पाठपुराव्यादरम्यान माझ्या मनात विविध कल्पना होत्या. सदर विद्यापीठ निर्मितीमागे विविध महत्त्वपूर्ण उद्दिष्टही होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचा आशावाद : गोंडवानाच्या वर्धापन दिनी प्राचार्य, कर्मचाºयांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ निर्मितीच्या पाठपुराव्यादरम्यान माझ्या मनात विविध कल्पना होत्या. सदर विद्यापीठ निर्मितीमागे विविध महत्त्वपूर्ण उद्दिष्टही होते. आता विद्यापीठ होऊन सहा वर्षांचा कालवधी उलटला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून हा जिल्हा खनिज संपत्ती, लोककला व इतर वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ हे केवळ पदवी देणारे विद्यापीठ होऊ नये, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती उपयुक्त ठरण्यासाठी या विद्यापीठामार्फत पर्यावरणपूरक विविध अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे शेकडो हात निर्माण झाले पाहिजे, असा आशावाद राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.गोंडवाना विद्यापीठाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी विविध पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी मंचावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी तर विशेष अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, नगराध्यक्ष योगीता पिपरे, विद्यापीठाचे कुलसचिव दिपक जुनघरे, डॉ. ईश्वर मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आता ज्ञान साधनेची व्याख्या बदलावी लागणार आहे. स्मार्ट फोनच्या सहाय्याने जगातील सर्व माहिती एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पुस्तकांची फारशी गरज नाही. अर्थातच ज्ञानसाधने उपलब्ध आहेत. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानभंडारही आहे. केवळ कल्पकतेची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनेला व संशोधन वृत्तीला चालणा देण्याचे काम या विद्यापीठामार्फत झाले पाहिजे. तेव्हाच येथील विद्यार्थी स्वावलंबी व सर्वदृष्ट्या सक्षम होईल, असेही नामदार मुनगंटीवार यावेळी म्हणाले.विद्यापीठाला २०० एकर जमिनीची गरज आहे. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. विद्यापीठ प्रशासनाने इमारतीचा नकाशा द्यावा, शिवाय प्रशासनाने फाईल्सचा पाठपुरावा करावा. नामदार विनोद तावडे यांच्यासोबत मी सुध्दा पूर्ण ताकदनिशी विद्यापीठाला जमीन व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कटिबध्द आहो, असेही अभिवचन नामदार मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.पर्यावरणयुक्त विद्यापीठाचा जिल्हा म्हणजे, गडचिरोली आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या मानांकनात विद्यापीठ अग्रेसर राहिल. दुसºयाला मदतीचा हात देणारे विद्यार्थी या विद्यापीठातून घडले पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त शिक्षण देणारे, माणुसकी देणारे व स्वावलंबनाचे धडे देऊन स्वयंरोजगाराची कास धरणारे देशातील उत्तम विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठ ठरावे, असा आशावाद मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सत्कारमूर्ती समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार कुलसचिव दीपक जुनघरे यांनी मानले.कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष, संस्थेचे संचालक, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.अभाविपने शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखविलेअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ना. तावडे यांना काळे झेंडे दाखवत विविध घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी अभाविपच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली. मागील तीन वर्षांपासून शिक्षणमंत्र्यांनी विद्यापीठाच्या निवडणुका लोकशाही पध्दतीने होणार असल्याचा गाजावाजा केला. केवळ थापा मारून विद्यार्थ्यांचे नेतृत्व होणार नाही तर काही कामेसुध्दा शिक्षण विषयावर आणि तरूणांच्या नेतृत्वावर शिक्षणमंत्र्यांनी करायला हवे, हे जमत नसेल तर शिक्षणमंत्र्यांनी खुर्ची खाली करावी, अशा प्रकारच्या घोषणा अभाविपने दिल्या. जिल्हा संयोजक हर्षल गेडाम, नगरमंत्री साहिल धाईत यांच्या नेतृत्वात ना. तावडे यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. पाच प्रमुख कार्यकत्र्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये हर्षल गेडाम, साहिल धाईत, न्युटन मंडल, नगर संघटनमंत्री तेजस मेहरकुरे, सुरज काटवे यांचा समावेश आहे. आंदोलनात चेतन कोडवते, चिराग नंदेश्वर, गोपाल देशमुख अतुल मडावी, योगेश ताराम सहभागी झाले होते.