शासकीय हमीभाव आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच मक्याची विक्री केली. सध्या तीन महिन्यांचा कालावधी उलटला; परंतु चुकारे मिळाले नाही. आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फतीने कुरखेडा आविका संस्थेच्या वतीने कुरखेडा येथे खरेदी केंद्रावर जवळपास तीन हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आला, तसेच जिल्ह्यातील अन्य केंद्रांवर हजारो क्विंटल मका खरेदी करण्यात आला; परंतु तीन महिन्यांपासून चुकारे न मिळाल्याने व दोन दिवसावर पोळा सण असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. ही अडचण ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी व चुकारे लवकर अदा करावे, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडाचे उपाध्यक्ष चांगदेव फाये यांनी दिला आहे.
040921\img-20210904-wa0136.jpg
फोटो चांगदेव फाये