शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रेयच्या एजंटची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:20 IST

मैत्रय कंपनीत ज्या नागरिकांनी पैसे गुंतविले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, यासाठी मैत्रेय कंपनीच्या प्रतिनिधी व ठेवीदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ....

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पैसे परत करण्यासाठी पुढाकार घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मैत्रय कंपनीत ज्या नागरिकांनी पैसे गुंतविले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, यासाठी मैत्रेय कंपनीच्या प्रतिनिधी व ठेवीदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.मैत्रेय सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने काही वर्षांपूर्वी गडचिरोली येथे कार्यालय स्थापन केले. सेबीने २०१३ मध्ये आर्थिक व्यवहार बंद करण्याचे निर्देश दिले. मात्र कंपनीने याबाबत प्रतिनिधींना कळविले नाही. ठेवीदारांचे पैसे दुसरी कंपनी स्थापन करून त्या कंपनीमध्ये वळविले. न्यायालयाच्या निर्देशानुसार कंपनीची मालमत्ता विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत केले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांचे जवळपास आठ कोटी रूपये परत करण्यात आले आहेत. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील एकाही ठेवीदाराचे पैसे परत झाले नाही. मैत्रयमध्ये प्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त महिला कार्यरत होत्या. ठेवीदारांचे पैसे परत मिळत नसल्याने प्रतिनिधींना मानसिक त्रास होत आहे. ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.आंदोलनाचे नेतृत्व रूचित वांढरे, आनंदराव पिपरे, आशिष ब्राह्मणवाडे, कल्पना म्हशाखेत्री, प्रिती नरूले, अर्चना कोटांगले, विनोद बांबोळे, विलास कांबळे यांनी केले.