शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना महावितरणचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:42 IST

जवळपास ३० हजार रूपयांचे वीज देयक प्रलंबित असल्याच्या कारणावरून महावितरणने अहेरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वीज पुरवठा मीटर काढून बंद केला होता.

२५ दिवसानंतरही वीज नाही : जिल्हा प्रशासनाकडून बेदखलविवेक बेझलवार । लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जवळपास ३० हजार रूपयांचे वीज देयक प्रलंबित असल्याच्या कारणावरून महावितरणने अहेरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वीज पुरवठा मीटर काढून बंद केला होता. मात्र बिल भरून २५ दिवसांचा कालावधी उलटूनही महावितरणने वीज मीटर बसवून येथील वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला नाही. परिणामी अहेरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा पूर्णत: बंद आहे.वीज पुरवठा खंडित केल्यानंतर ‘लोकमत’मध्ये बातमी झळकताच पालकमंत्र्यांसह नगर पंचायत, नगर विकास विभाग आणि जिल्हा प्रशासन हादरून गेले. लोकमतमधील वृत्ताचा संदर्भ देत पालकमंत्र्यांनी बिल भरण्याचे निर्देश दिले. नगर पंचायत प्रशासनाने लगेच थकीत देयक अदा केले. मात्र त्यानंतरही कॅमेरे सुरू झाले नाही.जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने १५ आॅक्टोबर २०१६ ला अहेरी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेराची सेवा सुरू करण्यात आली. मात्र नगर पंचायत प्रशासनाने अवघ्या ३० हजार रूपयांच्या वीज बिलाचा भरणा न केल्याने गेल्या चार महिन्यांपासून अहेरीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. अहेरी शहरात गर्दीच्या २४ ठिकाणांवर या कॅमेऱ्यांची नजर राहत होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सात वेगवेगळे मीटर लावण्यात आले होते. या सातही मीटरचे मिळून जवळपास ३० हजार रूपयांचे बिल नगर पंचायतीला प्राप्त झाले. मात्र नगर पंचायतीने महावितरणकडे या वीज बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेराचा वीज पुरवठा महावितरणने २३ फेब्रुवारीला खंडीत केला. तेव्हापासून कॅमेरे बंदच आहेत. या संदर्भातील लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी लागलीच नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना थेट पत्र पाठवून सीसीटीव्ही कॅमेराची सेवा तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नगर पंचायत प्रशासनाने विशेष बैठक बोलावून त्यात मंजुरी देऊन थकीत जवळपास ३० हजार रूपये वीज बिलाचा भरणा केला. या संदर्भात नगर पंचायत प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना २३ जून २०१७ ला पत्रानिशी कळविले. मात्र त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे महावितरणतर्फे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी मीटर बसवून वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला नाही. या साऱ्या बाबीवरून वीज पुरवठा सुरू करण्याच्या कामात किती दिरंगाई होते, याची प्रचिती येत आहे.आजपर्यंत अहेरी येथील महावितरण कार्यालयाकडे वीज मीटर उपलब्ध नव्हते. मात्र आता वीज मीटर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात अहेरीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या यंत्रणेसाठी सर्व मीटर लावून वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल.- अमित शेंडे, सहायक अभियंता, वीज वितरण विभाग, अहेरी