शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला चोरांचा शॉक

By admin | Updated: August 10, 2014 23:00 IST

महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे.

गडचिरोली : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या प्रमाणेच वीज हीसुद्धा आवश्यक गरज बनली आहे. घरातील बहुतांश साधणे विजेवरच चालत असल्याने विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापर्यंत वीज पोहोचली असली तरी गडचिरोली जिल्हा मात्र याला अपवाद ठरत आहे. जिल्ह्यातील शेकडो गावांपर्यंत अजूनही वीज पुरवठा झाला नाही. आजही शेकडो गावे अंधारातच आहेत.नक्षल्यांची भीती व गावापर्यंत पोहोचण्यास रस्ता नाही. हे कारण पुढे करीत महावितरणचे बहुतांश कर्मचारी ग्रामीण भागात प्रत्यक्ष जात नाही. पावसाळ्याचे चार महिने तर महावितरणचे कर्मचारी गावाचा उंबरठाही झिजवित नाही. याचा फायदा स्थानिक नागरिकांकडून घेण्यात येते. बहुतांश गावामध्ये सायंकाळच्या सुमारास पथदिव्यांवरील तारावर आखोडा टाकून विजेची चोरी केली जाते. त्यानंतर सकाळीच आखोडा काढून जात असल्याने वीज चोरीचा पत्ताच लागत नाही. अशा पद्धतीने ग्रामीण व दुर्गम भागात विजेची खुलेआम चोरी केली जात आहे. महावितरणचे कर्मचारी गावाला भेट देत नाही. हे पक्के ठाऊक असल्याने दिवसेंदिवस विजेच्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकसंख्येनुसार व विद्युतजोडणीच्या संख्येनुसार महावितरणच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. हे सूत्र राज्याच्या इतर भागात योग्य असले तरी या सूत्राची गडचिरोली जिल्ह्यात अंमलबजावणी करून त्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे चुकीचे आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यातील लोकसंख्या विरळ आहे. एका गावामध्ये केवळ १० ते १५ च्या संख्येत विद्युत जोडण्या दिसून येतात. महावितरणच्या या चुकीच्या नियमामुळे एका कर्मचाऱ्याकडे ३० ते ४० किमी अंतराच्या गावांमधील काम सोपविले जाते. जवळपास ४० ते ५० गावांचा कारभार त्याला बघावा लागतो. हे सर्व करतांना महावितरणच्या कर्मचाऱ्याचे दमछाक उडते ही वीज चोरीच्या प्रमाणात वाढ होण्याचे महत्वाचे कारण आहे. वीज चोरी व वीज गळतीच्या प्रमाणात वाढ झाल्याने महावितरण कंपनीला तोट्याचा सामना करावा लागतो. हा तोटा वीजबिल वाढवून इतर ग्राहकांकडून वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व चुकीचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून कर्मचाऱ्यांना कामाला लावावे व कर्मचाऱ्यांवरील भार कमी करण्यासाठी अधिकचे कर्मचारी नियुक्त करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा, कोरची, धानोरा, एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वीज चोरीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)