शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

महावितरणने कापली ३२ मोबाईल टॉवरची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:36 IST

बीएसएनएलने मागील दोन ते तीन महिन्यांपासून मोबाईल टॉवर व एक्स्चेंज आॅफिसचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे जिल्हाभरातील सुमारे ३२ मोबाईल टॉवर व एक्सचेंज आॅफीसचा वीज पुरवठा १२ फेब्रुवारी रोजी खंडित करण्यात आला.

ठळक मुद्दे१७ टॉवरची सेवा ठप्प : वीज बिल न भरणे बीएसएनएलला नडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बीएसएनएलने मागील दोन ते तीन महिन्यांपासून मोबाईल टॉवर व एक्स्चेंज आॅफिसचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे जिल्हाभरातील सुमारे ३२ मोबाईल टॉवर व एक्सचेंज आॅफीसचा वीज पुरवठा १२ फेब्रुवारी रोजी खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित होताच खळबळून जागे झालेल्या बीएसएनएलच्या मुंबई येथील कार्यालयाने त्याच दिवशी दुपारपर्यंत १५ मोबाईल टॉवरचे वीज बिल भरले. त्यामुळे सदर मोबाईल टॉवर १३ फेब्रुवारी रोजी सुरू झाले. मात्र १७ मोबाईल टॉवरचा अजूनही वीज पुरवठा खंडितच आहे.थकीत वीज बिलामुळे महावितरण आर्थिक अडचणीत येत आहे. त्यामुळे वीज बिल थकविणाऱ्या सामान्य ग्राहक, शासकीय कार्यालये किंवा कंपन्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. याची अंमलबजावणी महावितरण गडचिरोली जिल्ह्यात अतिशय कडकपणे करीत आहेत. बीएसएनएलच्या टॉवर व एक्स्चेंज आॅफिसचे वीज बिल भरण्याची जबाबदारी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे आहे. या कार्यालयाने नियमितपणे वीज बिल भरणे अपेक्षित आहे. मात्र दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही वीज बिलाचा भरणा करण्यात आला नाही. परिणामी वीज पुरवठा खंडित करण्याची नामुष्की बीएसएनएलला पत्करावी लागली.मंगळवारी सकाळी वीज पुरवठा खंडित केल्यानंतर दुपारपर्यंत वीज बिल भरण्यात आले. त्यानंतर बुधवारी एमएसईबीने वीज पुरवठा पुन्हा सुरू करून दिला. मात्र बीएसएनएलच्या दुर्लक्षितपणाच्या कारभाराचा फटका ग्राहकांना बसला आहे.काही ठिकाणी जनरेटर उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी दुपारच्या सुमारास जनरेटर लावले जात आहेत. मात्र डिझेलचीही समस्या गंभीर आहे. गडचिरोली जिल्ह्यात केवळ तालुकास्थळीच पेट्रोलपंप आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर आहे. अशा परिस्थितीत दिवसरात्रभर जनरेटरवर मोबाईल टॉवर चालविणेही कठीण होते.या टॉवरचा वीज पुरवठा झाला खंडित१७ टॉवर व एक्स्चेंज आॅफिसचे वीज बिल अजूनही भरण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचा वीज पुरवठा खंडितच आहे. यामध्ये विसापूर, आष्टी, सुंदरनगर, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, चामोर्शी, आलापल्ली हे आठ एक्सचेंज आॅफीस व सुंदरनगर, एटापल्ली, गडचिरोलीजीवळील सेमाना सोनसरी, अंगारा, घोट, कोरची, बोदली या टॉवरचा समावेश आहे.१५ टॉवर व एक्स्चेंज आॅफीसचा वीज पुरवठा मंगळवारी खंडित करण्यात आला. त्याच दिवशी वीज बिल भरल्याने बुधवारी उशीरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यामध्ये सिरोंचा, आरमोरी, वैरागड, मुरूमगाव, धानोरा, चातगाव, देसाईगंज एक्सचेंज आॅफीस तसेच तळोधी, आरमोरीतील बर्डी, पाथरगोटा, आरमोरी तहसील कार्यालय, सुकाळा, जोगीसाखरा, देलनवाडी, कासवी यांचा समावेश आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलelectricityवीज