शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

Maharashtra Election 2019 ; मतदान टक्केवारीने गाठली सत्तरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या वेळी मुख्यालयी पोहोचतात. सोमवारी दुपारी ३ वाजता मतदान आटोपले असले तरी हे कर्मचारी बेस कॅम्प या सुरक्षित स्थळीच मुक्कामी होते. तेथून मतदार संघाच्या मुख्यालयी पोहोचण्यासाठी बहुतांश केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मंगळवारची सायंकाळ झाली.

ठळक मुद्दे्गेल्या दोन निवडणुकींपेक्षा सरस : गडचिरोली, अहेरीत २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील तीनही मतदार संघाची विधानसभा निवडणूक यावेळी अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. अभूतपूर्व जनजागृतीसोबतच नक्षलवाद्यांचे हिंसक कारवाया करण्याचे मनसुबे हाणून पाडण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. परिणामी गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी पार करण्यात यावेळी यश आले.मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार सर्वाधिक ७१.२ टक्के मतदान आरमोरी मतदार संघात झाले आहे. गडचिरोलीत ६८.४७ तर सर्वात जास्त नक्षलप्रभावित आणि दुर्गम भाग असलेल्या अहेरीत ७०.३४ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झालेली नव्हती. काही केंद्रांवरील आकड्यांची भर त्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली.आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तीनही मतदार संघातील ७ लाख ७५ हजार ३६९ मतदारांपैकी जवळपास साडेचार लाखावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे ९३२ मतदान केंद्रांपैकी ४५ टक्के मतदान केंद्र संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल होते. त्यापैकी एटापल्ली तालुक्यात काही मतदान केंद्र वेळेवर दुसरीकडे हलविण्यात आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र तरीही त्यांनी मोठ्या हिमतीने त्या केंद्रांवर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. नक्षलवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाला भीक न घालता मतदारांनी विविध अडचणींवर मात करत दाखविलेली हिंमत प्रशासकीय यंत्रणेच्या उत्साहात भर घालणारी ठरली. दुर्गम भागात युवा पिढीपेक्षाही प्रौढ मतदारांमध्ये जास्त उत्साह आणि आशा दिसून आली.३१ तासानंतर नेमकी टक्केवारी नाहीचसंवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या वेळी मुख्यालयी पोहोचतात. सोमवारी दुपारी ३ वाजता मतदान आटोपले असले तरी हे कर्मचारी बेस कॅम्प या सुरक्षित स्थळीच मुक्कामी होते. तेथून मतदार संघाच्या मुख्यालयी पोहोचण्यासाठी बहुतांश केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मंगळवारची सायंकाळ झाली. त्यानंतर बुथनिहाय सर्व आकडेवारी पडताळणी करण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे मतदानाची वेळ संपल्यापासून ३१ तासानंतरही म्हणजे मंगळवारच्या रात्री १० वाजतापर्यंत मतदानाच्या टक्केवारीचा अंतिम आकडा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला नव्हता.नक्षलवाद्यांचे मनसुबे फेलनक्षलवाद्यांकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही घातपाती कारवाया, गोळीबार, भूसुरूंग स्फोट घडवून आणले जाण्याची शक्यता पाहता पोलीस दलाने योग्य ती खबरदारी घेत सर्व तयारी केली होती. त्यामुळे नक्षलवादी कोणत्याही कारवाया घडवून आणण्यात यशस्वी झाले नाही. गेल्या अनेक निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत नक्षली कारवाया नियंत्रणात राहिल्या.अभूतपूर्व जनजागृतीनिवडणुकीचे कर्तव्य प्रत्येक मतदाराने पार पाडाने यासाठी जिल्हाभरात अभूतपूर्व अशी जनजागृती झाली. शाळा-महाविद्यालयांपासून तर सण-उत्सवापर्यंत सर्वच ठिकाणी मतदानाचे महत्व सांगण्यात आले. गावागावात रॅली काढून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून नक्षली दहशतीतही नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली