शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; आता गुप्त प्रचारावर जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील तीनही मतदार संघांमधील ९३२ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी ४५ टक्के केंद्र संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासूनच तीन हेलिकॉप्टरच्या मदतीने बेस कॅम्पवर नेण्याचे काम सुरू होते. शनिवारीही हे काम सुरूच होते.

ठळक मुद्देरॅलींमधून उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन । निवडणुकीचे भोंगे झाले शांत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी दुपारी ३ वाजता शांत झाली. अनेक उमेदवारांनी शहरी भागात रॅलींमधून शक्तीप्रदर्शन करत मतदारांना शेवटचे आवाहन केले. आता सोमवारच्या सकाळपर्यंत गुप्त प्रचारातून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न होणार असल्यामुळे विविध पथकांसह पोलीस यंत्रणेला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.जिल्ह्यातील तीनही मतदार संघांमधील ९३२ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी ४५ टक्के केंद्र संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासूनच तीन हेलिकॉप्टरच्या मदतीने बेस कॅम्पवर नेण्याचे काम सुरू होते. शनिवारीही हे काम सुरूच होते. याशिवाय इतर केंद्रावरील कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाच्या बस व इतर वाहनांनी रवाना करण्यात आले.शनिवारी अहेरी मतदार संघातील २२३ केंद्रांवरील कर्मचारी, आरमोरी मतदार संघातील १३५ केंद्रांवरील कर्मचारी तर गडचिरोली मतदार संघातील ९० केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी विविध साहित्यासह रवाना करण्यात आले.आतापर्यंत नाकाबंदीदरम्यान केलेल्या वाहनांच्या तपासणीत अनधिकृत रक्कम, दारू आणि दारूची आयात करणाऱ्या वाहनांना मिळून एकूण ८५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. विशेष म्हणजे गडचिरोलीच्या सभोवताल सीमा लागून असणाऱ्या छत्तीसगड आणि तेलंगणासह एकूण ७ जिल्ह्यांच्या सीमेत ५ किलोमीटरपर्यंतच्या परिसरात दि.२१ पर्यंत दारूबंदी लागू करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.प्रत्येक मतदार संघात सखी बुथ (सर्व महिला कर्मचारी) राहणार असून गडचिरोली मतदार संघात ३, तर आरमोरी आणि अहेरी मतदार संघात प्रत्येकी एक बूथ सखी बुथ राहणार आहे. त्या ठिकाणी ेकेंद्राधिकाऱ्यापासून तर सुरक्षा रक्षकापर्यंत सर्व जबाबदाºया महिलांकडेच राहतील.मतदानाची सर्वोच्च टक्केवारी गाठण्याचे आवाहनजिल्ह्यातील मतदार सूज्ञ असून प्रत्येक मतदार मतदानाचा अधिकार बजावतील, असा विश्वास व्यक्त करताना या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी लोकसभेत झालेल्या मतदानाची टक्केवारी (७१.९८ टक्के) पार करून सर्वोच्च टक्केवारी गाठावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केले. त्यांनी निवडणुकीच्या तयारीची पूर्ण माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे, ना.तहसीलदार सुनील चडगुलवार उपस्थित होते.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली