शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; उमेदवारांकडून शेवटचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा हा सर्वात दुर्गम तालुका आहे. या तालुक्यामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारावर बऱ्यापैकी भर दिला. तसेच चामोर्शी हा विस्ताराने मोठा तालुका आहे. जवळपास निम्मे मतदार या तालुक्यात असल्याने बहुतांश उमेदवारांनी चामोर्शी येथे पक्ष कार्यालय उघडले व तेथून तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचाराची सूत्रे हलविली.

ठळक मुद्देउद्या प्रचार थांबणार : शहरी भागात येणार प्रचाराला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याला सुरूवात झाली असून शनिवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबणार आहे. उमेदवारांकडे आता दोनच दिवस शिल्लक असल्याने प्रचाराचा जोर व वेग वाढविण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे.उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ८ ऑक्टोबरपासून उमेदवारांना प्रचार करता येणार होता. मात्र या दिवशी दसरा असल्याने अनेक उमेदवारांनी ९ ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरूवात केली. सुरूवातीच्या दिवसात दुर्गम व ग्रामीण भागात प्रचार करण्यावर विशेष भर देण्यात आला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा हा सर्वात दुर्गम तालुका आहे. या तालुक्यामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारावर बऱ्यापैकी भर दिला. तसेच चामोर्शी हा विस्ताराने मोठा तालुका आहे. जवळपास निम्मे मतदार या तालुक्यात असल्याने बहुतांश उमेदवारांनी चामोर्शी येथे पक्ष कार्यालय उघडले व तेथून तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचाराची सूत्रे हलविली.गडचिरोली शहरात जवळपास ३० हजार मतदार आहेत. त्यामुळे निकालाच्या दृष्टीने गडचिरोली शहराचा कल कोणत्या बाजूने राहतो, हे ही महत्त्वाचे ठरणार आहे. तरीही आजपर्यंत गडचिरोली शहरात पाहिजे तेवढा प्रचार करण्यात आला नाही. शुक्रवारी व शनिवारी उमेदवारांकडून गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या शहरांमध्ये प्रचार रॅली काढल्या जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने उमेदवारांकडून नियोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ते बोलावून शहरात गर्दी करून आपली ताकद अधिक दाखविण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहे. शुक्रवारी व शनिवारी पक्षांच्या रॅलींनी शहरे गजबजून जाण्याची शक्यता आहे.शनिवारनंतर केला जाणार छुपा प्रचारमतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मतदानाच्या वेळेपासून ४८ तासांपूर्वी प्रचार बंद करावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेतले जाते. त्यानुसार शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंतच उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. निवडणूक विभागाच्या नियमानुसार जाहीर व खुलेआम प्रचार बंद होणार असला तरी उमेवार व त्यांचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने प्रचार करतील. हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. याच कालावधीत मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना विविध प्रलोभने दाखवून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे काम करण्याची जबाबदारी गावातील जबाबदार कार्यकर्त्यावर दिली जाते. विशेष म्हणजे रविवारी रात्री सुद्धा मतदारांच्या भेटी घेतल्या जातील. ग्रामीण भागात हे प्रकार अधिक प्रमाणात घडतात.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली