लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उमेदवार, मतदार व प्रशासनाने जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, माध्यमांनीही थोडी सतर्कता बाळगावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक प्रवीण गुप्ता यांनी दिले.यावेळी निवडणूक निरीक्षक आर.एस.धिल्लन, युरिंदर सिंग, हिंगलजदन, व्ही.आर.के.तेजा व लव कुमार आदी उपस्थित होते. प्रत्येक मतदार संघासाठी जनरल एक व पोलीस एक अशा दोन आयएएस व आयपीएस दर्जाच्या निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी एक अतिरिक्त खर्च निरीक्षक नेमण्यात आला आहे. निवडणूक तयारीच्या कामाकाजाची माहिती घेणे सुरू झाले आहे. आचारसंहिता भंग व निवडणूक प्रक्रियेबाबत तक्रारी असल्यास संबंधितांनी निरीक्षकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन निवडणूक निरीक्षक प्रवीण गुप्ता यांनी पत्रपरिषदेत केले. जिल्ह्यातील मतदारांना मतदानाविषयी माहिती असणाऱ्या चिट्ट्या प्रशासनाच्या वतीने ९ आॅक्टोबरपासून वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ९९.४१ टक्के लोकांना मतदान ओळखपत्र दिलेले आहे. मतदानाच्या वेळी ते सोबत आणावे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह सांगितले. याप्रसंगी पोलीस शैलेश बलकवडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, नायब तहसीलदार चुडगुलवार आदी उपस्थित होते.
Maharashtra Election 2019 : निवडणुका पारदर्शकपणे पार पाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:30 IST
निवडणूक निरीक्षक आर.एस.धिल्लन, युरिंदर सिंग, हिंगलजदन, व्ही.आर.के.तेजा व लव कुमार आदी उपस्थित होते. प्रत्येक मतदार संघासाठी जनरल एक व पोलीस एक अशा दोन आयएएस व आयपीएस दर्जाच्या निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी एक अतिरिक्त खर्च निरीक्षक नेमण्यात आला आहे. निवडणूक तयारीच्या कामाकाजाची माहिती घेणे सुरू झाले आहे.
Maharashtra Election 2019 : निवडणुका पारदर्शकपणे पार पाडा
ठळक मुद्देनिवडणूक निरीक्षकांचे निर्देश : निवडणूक तयारीची घेतली माहिती