महाराष्ट्र दर्शन सहल : पोलीस विभागाच्या वतीने महाराष्ट्र दर्शन सुवर्ण जयंती सहल योजनेंतर्गत सहलीची दहावी तुकडी शनिवारी महाराष्ट्र दर्शनासाठी रवाना करण्यात आली. यामध्ये पाच नक्षल पीडित कुटुंबातील सदस्य, पाच नक्षल सदस्यांचे नातेवाईक यांच्यासह दुर्गम भागातील ८१ विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग आहे. सदर विद्यार्थी २ सप्टेंबरपर्यंत सहलीचा आनंद लुटणार आहेत. गडचिरोलीवरून रवाना होतेवेळी पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, मंजूनाथ सिंगे, प्रकल्प अधिकारी विकास राचर्लावार व सहायक प्रकल्प अधिकारी कुलकर्णी उपस्थित होते.
महाराष्ट्र दर्शन सहल :
By admin | Updated: August 23, 2015 01:47 IST