शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महाराजस्व अभियानाला कर्मचाऱ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:49 IST

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनी येथे राजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुतांश विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. संबंधितांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई करावी, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.

ठळक मुद्देकारवाई करण्याचे आमदारांचे निर्देश : काही तलाठी, कोतवाल व मंडळ अधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनी येथे राजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुतांश विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. संबंधितांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई करावी, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय महाराजस्व अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाला सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमाला काही मोजके तलाठी, कोतवाल व मंडळ अधिकारी उपस्थित होते. मात्र ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व इतर विभागाच्याही अधिकारी उपस्थित नव्हते. कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती बघून आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केले. कारण नसताना कार्यक्रमाला अनुपस्थित असलेल्या कर्मचाºयांवर कारवाई करावी. तसेच त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करावे, असे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत. महाराजस्व अभियानाला तालुकाभरातून शेकडो शेतकरी उपस्थित होते. मात्र कर्मचारी व अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागले. या कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह नगराध्यक्ष योगीता पिपरे, पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, नगरसेवक केशव निंबोड, तहसीलदार दयाराम भोयर, संवर्ग विकास अधिकारी विजय पचारे, सहायक संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे आदी उपस्थित होते.रॉयल्टीसाठी वसा उपसरपंचांची विनवणीवसा ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या पांदन रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी ग्रामपंचायतीने ७०० ब्रासची रॉयल्टी २०१६ मध्ये काढली होती. त्याचे पैसे सुध्दा महसूल विभागाकडे भरले. ३०० ब्रासची रॉयल्टी देण्यात आली. उर्वरित रॉयल्टी मात्र देण्यात आली नाही. पांदन रस्त्यावर मुरूम टाकणे आवश्यक असल्याने महसूल विभागाने रॉयल्टी द्यावी, यासाठी वसाचे उपसरपंच शंकर इंगळे यांनी मंडळ अधिकारी सोनकुसरे यांना विनवणी केली. एवढेच नव्हे तर इंगळे हे सोनकुसरे यांच्या पायाही पडले. त्यानंतर आमदार डॉ. देवराव होळी व उपसभापती विलास दशमुखे यांनी संबंधित ग्रामपंचायतीला लवकर रॉयल्टी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिले.