शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेसाठी महादेवगड मंदिर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 01:28 IST

महाशिवरात्री यात्रेला सोमवार ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या दृष्टीने जिल्हाभरातील शिव मंदिरासह अन्य मंदिरे सज्ज झाली आहेत. अनेक मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळणार असल्याने यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपहाडीवर तयारी पूर्ण : सोमवारपासून दर्शनासाठी उसळणार हजारो भाविकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी/वैरागड : महाशिवरात्री यात्रेला सोमवार ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या दृष्टीने जिल्हाभरातील शिव मंदिरासह अन्य मंदिरे सज्ज झाली आहेत. अनेक मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळणार असल्याने यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पळसगाव-अरततोंडी येथील महादेवगडावर यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.महादेवगडावर दरवर्षी भाविकांची अलोट गर्दी उसळते. त्यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा अनेक दुकाने लावण्याकरिता मंदिर ट्रस्टच्या वतीने तात्पुरते लाकडी शेड उभारण्यात आले आहेत. यात्रेला हजारो भाविकांची गर्दी उसळत असते. त्यामुळे सकाळपासूनच रात्रीपर्यंत भाविकांच्या लांब रांगा असतात. यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. पळसगाव परिसरातील जंगलातील पहाडावर हे मंदिर असल्याने वर्षभर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असते. अनेक भाविक संपूर्ण कुटुंबासह दर्शनासाठी दाखल होतात. त्यामुळे भाविकांना आपले वाहन उभे करण्यासाठी वाहनतळ निर्माण करण्यात आले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. ४ मार्चपासून येथे यात्रेला सुरूवात होणार असून ११ मार्चला समारोप होणार आहे. यात्रेदरम्यान ५ मार्चपासून भागवत सप्ताह होईल. या सप्ताहात प्रवचनकार सुरेखा तिखे प्रबोधन करतील.भंडारेश्वर देवस्थानात आज होणार घटस्थापनाआरमोरी तालुक्यातील वैरागड येथील भंडारेश्वर देवस्थानात ३ ते ५ मार्चपर्यंत महाशिवरात्री यात्रा भरविली जाणार आहे. श्री क्षेत्र भंडारेश्वर देवस्थान समिती तथा ग्रामपंचायत वैरागड यांच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. रविवार ३ मार्चला सायंकाळी घटस्थापना होईल. रात्री ९ वाजता भजन, ४ मार्चला सकाळी ६ वाजता महापूजा व अभिषेक होईल. दुपारी १२ वाजता हवन, दुपारी २ वाजता उपवासाचा नाश्ता वितरित होईल. रात्री ९ वाजता प्रहार पूजा, भजन व जागरण होईल. मंगळवार ५ मार्चला सकाळी ६ वाजता पूजापाठ, सकाळी ११.३० वाजता प्रबोधन, दुपारी १ वाजता गोपालकाला, दुपारी ३ वाजता महाप्रसाद वितरण, सायंकाळी ६.१५ वाजता ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते टिपूर जाळला जाईल. रात्री १० वाजता महिला संच नाट्यप्रयोग सादर करतील.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री