शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजचे अधिकारी पोहोचले शेतावर

By admin | Updated: October 24, 2015 01:18 IST

आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीमार्फत सुटीच्या दरात १०० क्विंटल धान्य पुरविण्यात आले होते.

लोकमतच्या वृत्ताची दखल : पिकांची केली पाहणीवैरागड : आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीमार्फत सुटीच्या दरात १०० क्विंटल धान्य पुरविण्यात आले होते. शेतकऱ्यांनी साबां मसुरी या वाणाचे पऱ्हे टाकून पेरणी केली. परंतु बियाणे निकृष्ट असल्याने धान रोवणीपासूनच रोग व विविध किडींचा प्रादुर्भाव झाला होता. यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महाबीजचे अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी वैरागडातील शेतीच्या बांधावर पोहोचून पिकांची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांनी साबां मसुरी धान लागवड केली, त्या धानाची लोंबी अद्यापही भरली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी यासंदर्भात आरमोरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रारी दाखल केल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन उपविभागीय कृषी अधिकारी एस. जी. गोथे व महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक जी. एम. चिरूटकर, तालुका कृषी अधिकारी एल. ए. कटरे, जिल्हा कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. एस. एल. बोरकर, महाबीजचे क्षेत्र सहायक पी. एन. गावळे, कृषी मंडळ अधिकारी माधवर, कृषी पर्यवेक्षक वरोकर, कृषी सहायक दीपा क्षीरसागर, अनिल उके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वैरागडचे शेतकरी विश्वनाथ ठेंगरे, भास्कर बोडणे, रमेश बोडणे, रामचंद्र क्षिरसागर, गोरख भानारकर, प्रदीप बोडणे उपस्थित होते. खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. प्रारंभी अनेक शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय, पंचायत समितीमधून बियाण्यांची खरेदी सुटीवर केली. अनेक शेतकऱ्यांनी खताची साठवणूक पूर्वीपासूनच केली होती. परंतु अनियमित पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला. (वार्ताहर)