शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मशीनरीज आल्या, मात्र तज्ज्ञ नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:19 IST

महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून आरमोरी येथे लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाची सुसज्ज इमारत बांधली. पाळीव जनावरावरील विविध आजाराचे निदान व्हावे, यासाठी गुराच्या तपासणीकरिता महागड्या मशिनरी येथे पुरविण्यात आल्या. मात्र आधीच रिक्त पदाने जर्जर असलेल्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा डोलारा एकाच पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर आहे. सदर प्रशस्त इमारत ...

ठळक मुद्देएकाच अधिकाऱ्यांच्या भरवशावर सेवा : पशुचिकित्सालयाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून आरमोरी येथे लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाची सुसज्ज इमारत बांधली. पाळीव जनावरावरील विविध आजाराचे निदान व्हावे, यासाठी गुराच्या तपासणीकरिता महागड्या मशिनरी येथे पुरविण्यात आल्या. मात्र आधीच रिक्त पदाने जर्जर असलेल्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा डोलारा एकाच पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर आहे. सदर प्रशस्त इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. महागड्या मशीन येथे पोहोचल्या असल्या तरी या मशीन हाताळण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली नाही. या सर्व समस्यांमुळे पशुवैद्यकीय सेवा अस्थिपंजर झाली असून पशुचिकित्सालयाच्या नव्या इमारतीचा कारभार ओस पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.आरमोरी येथे १ कोटी ९२ लाख रूपये खर्च करून शासनाच्या वतीने तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाची मोठी सुसज्ज इमारत दोन वर्षापूर्वीच बांधण्यात आली. येथे गुरांच्या विविध आजारांचे निदान व्हावे, यासाठी एक्स-रे मशीन, सोनोग्राफी व विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या करण्यासाठी नवीन मशीनरीज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र सदर मशीनरी हाताळण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे तज्ज्ञांअभावी मशीनरीज सेंटरचा काय उपयोग, गुरांच्या आजारांचे निदान कसे कळणार, असा प्रश्न पशुपालकांनी उपस्थित केला आहे. मात्र या गंभीर समस्येकडे शासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.सहायक आयुक्तांचे पद रिक्ततालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात एकूण पाच पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक पशुवैद्यकीय अधिकारी व २० दिवसांपूर्वी नियुक्त झालेला परिचर या दोघांच्या भरवशावर या चिकित्सालयाचा कारभार सुरू आहे. येथील मुख्य पद असलेले सहायक आयुक्तांचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. येथील सहायक आयुक्त डॉ. हरडे हे दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून सदर पद भरण्यात आले नाही. वरिष्ठ लिपीक व वर्णोपचाराचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. परिचराचे पद चार महिन्यांपासून रिक्त होते. ते नुकतेच भरण्यात आले. त्यामुळे या चिकित्सालयाची सर्व जबाबदारी एकट्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पराते यांच्यावर येऊन ठेपली आहे. त्यांची सुध्दा लाखांदूर येथे बदली झाली आहे. मात्र त्यांना रिलिव्ह करण्यात आले नाही. रिक्त पदांमुळे पशु सेवेवर परिणाम होत आहे.