शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तेंदू कंत्राटदारांची ग्रामसभांकडे लॉबिंग सुरू

By admin | Updated: March 17, 2017 01:21 IST

पेरमिली वनपरिक्षेत्रात सहा ग्रामपंचायती असून सर्वच ग्राम पंचायती पेसा अंतर्गत तेंदूपत्ता संकलनाचा अधिकार

पेरमिली परिसर : २०१५-१६ चा बोनस अजूनही मिळाला नाही पेरमिली : पेरमिली वनपरिक्षेत्रात सहा ग्रामपंचायती असून सर्वच ग्राम पंचायती पेसा अंतर्गत तेंदूपत्ता संकलनाचा अधिकार मिळालेल्या आहेत. सहाही ग्रामपंचायतीत तेंदूपत्ता युनिट लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच व ग्रामसभा सदस्य, पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठीत लोकांना प्रलोभन देऊन तेंदू कंत्राटदार लॉबिंग करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. तेंदू संकलन पारदर्शकपणे झाले पाहिजे, असे वन विभागाचे निर्देश आहे. त्याकरिता प्रशासनाने नियमावलीही तयार केली आहे. मात्र ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना १०० टक्के नागरिकांची उपस्थिती राहत नाही. मोजकेच नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे कोणताही ठराव पारीत न करता लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी अडचण निर्माण होते व संबंधित समितीचे त्यानंतर निर्णय घेऊन हे काम मार्गी लावत असते. अहेरी विभागासह गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात तेंदूपत्ता हंगाम हाच ग्रामीण लोकांचा मुख्य रोजगार आहे. वर्षभराची मिळकत त्यांना यातून उपलब्ध होते. मात्र या तेंदूपत्त्याची लिलाव प्रक्रिया सध्या ग्रामसभांच्या अखत्यारित असल्याने तेंदू कंत्राटदार ग्रामसेवक, सरपंच, पदाधिकारी यांना मॅनेज करून स्वत:चा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे अनेकवेळा तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनसपासून वंचित राहावे लागते. पेरमिली परिसरात वर्ष २०१५-१६ चा बोनस अजूनही वितरित करण्यात आला नाही. त्यामुळे तेंदू संकलनाचे काम करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे यंदातरी तेंदू संकलनाचे काम पारदर्शकपणे व्हावे, अशी मागणी आहे.