शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुल दोन जोडपी अडकली विवाहबंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:20 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा व चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे प्रेमीयुगुलांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.

ठळक मुद्देगेवर्धा व भेंडाळा येथे सोहळा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा/चामोर्शी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा व चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे प्रेमीयुगुलांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने विवाह सोहळा पार पाडण्यात आला. विजय श्रीराम दर्रो रा. सिंदेसूर ता. कुरखेडा व ज्याती रोहित कल्लो रा. बामणी ता. कुरखेडा असे विवाहबद्ध झालेल्या प्रेमीयुगुलांचे नाव आहे. मागील काही वर्षांपासून दोघांचे प्रेम बहरले होते. परंतु त्यांच्या विवाहाला आईवडिलांचा विरोध होता. अखेर दोघांनीही गेवर्धा गाठून तंमुसकडे विवाह करून देण्याची मागणी केली. समितीने दोघांच्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर हिंदू विवाह पद्धतीने सोहळा पार पाडण्यात आला. याप्रसंगी तंमुस अध्यक्ष कानचंद सयाम, सरपंच टिकाराम कोरेटी, उपसरपंच संदीप नखाते, ग्रा. पं. सदस्य रोशन सय्यद, माजी उपसभापती बबन बुद्धे, तंमुस सदस्य अनिराम बोगा, भोला पठाण, विजय ढवळे, यादव नाकतोडे, डाकराम मैंद, कंगाली, डॉ. नासिर खान, कृष्णा मस्के, रहिम पठाण, अविनाश भनारे, दिनेश कावळे, आनंद भनाईत, महादेव मडावी, तेजराम बुद्धे व नागरिक हजर होते.चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने १५ सप्टेंबरला प्रेमीयुगुलांचा विवाह सोहळा पार पडला. धनराज मंगलदास रेचनकर (२४) व अंजू भीमराव बंडावार रा. फोकुर्डी अशी विवाहबद्ध झालेल्या प्रेमीयुगुलांची नावे आहेत. दोघांच्या विवाह सोहळ्याला घरच्या कुटुंबातील व्यक्तींचा विरोध होता. त्यामुळे प्रेमीयुगुलांनी भेंडाळा गाठून तंटामुक्त समितीकडे अर्ज सादर करून विवाह लावून देण्याची विनंती केली. समितीने त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून दोघांचाही विवाह ग्रामपंचायत भवनात पार पाडला. याप्रसंगी तंटामुक्त समितीचे निमंत्रक पोलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, सरपंच नंदा मोगरे, सचिव कसारलावार, तंमुस अध्यक्ष गुरूदेव डांगे, माजी पं. स. सदस्य प्रमोद भगत, प्रमोद गोर्लावार, संजय चलाख, चरणदास चलाख, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नोमाजी सातपुते, उपाध्यक्ष साईनाथ चलाख, मंगलदास रेचनकर, भय्याजी तुंबडे, मनोहर तुंबडे, गजानन पोरेड्डीवार, वनीता पोरेड्डीवार, आशा डांगे, तंटामुक्त समितीचे तसेच ग्रा. पं. पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.