शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो

By admin | Updated: June 14, 2014 02:20 IST

आरमोरी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या वडधा परिसरातील गावांमधील ग्रामसेवक, पटवारी, प्राथमिक शिक्षक

वडधा : आरमोरी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या वडधा परिसरातील गावांमधील ग्रामसेवक, पटवारी, प्राथमिक शिक्षक व विविध कार्यकारी संस्थांचे कर्मचारी मुख्यालयी न राहता शहरामध्ये राहून सेवा देत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे शासकीय काम होण्यास अडथळा निर्माण होत आहे. सदर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. खरीप हंगामाच्या कामांना सुरूवात झाली आहे. शेतकरी वर्ग बियाणे, खते घेण्यासाठी बाहेर पडत आहे. मात्र खिशात पैसा नसल्याने एखाद्या बँकेकडून कर्ज घेण्यासाठी त्याची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. राष्ट्रीयकृत बँका दाखले जमा केल्याशिवाय कर्ज उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडचे दाखले गोळा करण्यासाठी जात आहेत. शेतकऱ्यांचा हंंगाम सुरू झाला असला तरी याचे काहीही लेनदेण ग्रामसेवक व तलाठ्याला नाही. त्यांचे उशिरा येणे व लवकर जाणे सुरूच आहे. हे कर्मचारी कधी येतात व कधी जातात याचा पत्ताच लागत नाही. एखाद्या ग्रामसेवक किंवा तलाठ्याला दूरध्वनीवरून संपर्क साधल्यास तालुकास्थळी मिटींग आहे, हे ठरलेले उत्तर देण्यात येते. त्यामुळे अत्यंत गरजू असलेल्या व्यक्तीला दिवसभर कार्यालयासमोर बसून संबंधित कर्मचाऱ्याची वाट पाहल्याशिवाय पर्याय राहत नाही. या पद्धतीमुळे पाच दाखले गोळा करण्यासाठी १० दिवसापेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने कर्ज मंजूर होण्यास उशिर होत आहे. महत्वाचे म्हणजे यातील एकही कर्मचारी मुख्यालयी न राहताही मुख्यालयी राहत असल्याचे बनावट दाखले जोडून मुख्यालयी राहत असल्याचा घरभाडा उचलत आहेत. यामध्ये काही वाटा वरिष्ठांचाही राहत असल्याने वरिष्ठ सुद्धा याबद्दल कोणतीही कारवाई करण्यास तयार नसल्याचे दिसून येते. १२ वीचा निकाल लागला आहे. जात प्रमाणपत्रासह इतर प्रमाणपत्र काढण्यासाठी वडिलाच्या टि. सी. ची गरज भासते. त्याचबरोबर काही विद्यार्थी शाळा बदलवित असल्याने त्यांनाही टि. सी. ची आवश्यकता आहे. मात्र गुरूजीही शहरातूनच ये-जा करत असल्याने ते सुद्धा मिळणे कठीण झाले आहे. मुख्यालयी न राहता, मुख्यालयाचा भत्ता उचलण्यात गुरूजीसुद्धा मागे नाही. त्यामुळे गुरूजीवरही कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे. मुख्यालयी न राहताही मुख्यालयाचा भत्ता उचलला जात असल्याने शासनाची कोट्यवधी रूपयाची लूट होत आहे. (वार्ताहर)