शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत मजुरी जमा करण्यास खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:34 IST

तेंदूपत्ता संकलनाची मजुरी रोखीने न देता संबंधित कामगारांच्या बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मागील वर्षीच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंत्राटदार तसेच ग्रामसभांना दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानताच याही वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी रोखीने देण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामसभांचेही दुर्लक्ष : तेंदूपत्ता कंत्राटदारांनी दिली रोखीने मजुरांची मजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेंदूपत्ता संकलनाची मजुरी रोखीने न देता संबंधित कामगारांच्या बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मागील वर्षीच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंत्राटदार तसेच ग्रामसभांना दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानताच याही वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी रोखीने देण्यात आली आहे.तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले असले तरी बहुतांश ग्रामसभा स्वत: तेंदूपत्ता संकलन न करता कंत्राटदाराला तेंदूपत्ता संकलनाचे अधिकारी देतात. कंत्राटदार ग्रामसभेला प्रती स्टॅन्डर्ड बॅग रॉयल्टी देते. तेंदूपत्ता व्यवसायातून पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक कंत्राटदाराने मजुरांच्या मजुरीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते. विविध योजनांसाठी दुर्गम व ग्रामीण भागातीलही नागरिकांचे बँक खाते उघडले आहेत. त्यामुळे बँक खात्यात मजुरी जमा करण्यास काहीच अडचण नाही. मात्र मजुरांचे बँक खाते नसल्यसाचे कारण पुढे करून कंत्राटदारांनी या वर्षीही मजुरांना रोखीने मजुरी दिली आहे. रोखीने मजुरी देताना ग्रामसभेने हस्तक्षेप करणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदारांनी ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन त्यांचे तोंड बंद केले. तेंदूपत्ता व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी तेंदूपत्त्याचे संंपूर्ण व्यवहार बँकेच्या मदतीने होणे गरजेचे आहे, अशी मागणी काही ग्रामसभांच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली आहे.मजुरांना देण्यासाठी रोख रक्कम नेतांना याबाबतची पूर्वसूचना पोलिसांना देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी कंत्राटदारांना दिल्या आहेत. मात्र पोलिसांनाही सूचना देण्यात आली नाही.काळा पैसा गुंतला तेंदूपत्त्यातकाही कंत्राटदार काळा पैसा तेंदूपत्ता व्यवसायात गुंतवतात. तसेच नक्षल्यांनाही तेंदूपत्ता कंत्राटदार मदत करीत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी बँक खात्यातच मजुरी जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे यावर्षीही काळा पैसा तेंदूपत्ता व्यवसायात पांढरा करण्यात आल्याची शक्यता आहे.