शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

वणव्याने बोरी जंगलाची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 01:44 IST

तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोरी जंगल परिसरात कक्ष क्र. २९७ मध्ये गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली.

लगामचे कार्यालय कुलूपबंद : लाखोंची वनसंपदा जळून खाकअहेरी : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोरी जंगल परिसरात कक्ष क्र. २९७ मध्ये गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. त्यामुळे जंगलाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र लगाम येथील वनपाल कार्यालय कुलूपबंद असल्याचे आढळून आले. वन विभागाच्या या बेजबाबदार कारभाराविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गुरूवारी सकाळीच बोरी परिसरातील जंगलाला आग लागली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास आगीने उग्र स्वरूप धारण केल्याने जंगलाला वणवा लागला असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. वणव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने वणवा वाढतच चालला होता. दरम्यान, वन्यप्रेमी संघटनेचे प्रमुख रामू मादेशी, वैशाली वाढणकर, माजी सरपंच लालू करपेत हे वणव्याची माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष लगाम येथील वनपाल कार्यालयात गेले असता, कार्यालयाला कुलूप लावून असल्याचे आढळून आले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता, कार्यालय बंद असल्याचे नेमके कारण सांगल्यास असमर्थतता दर्शविली. वणव्याची माहिती आलापल्लीचे उपवनसंरक्षक एच. के. मीना यांनाही वॉटस्अ‍ॅपवरून देण्यात आली. बोरी जंगलात सागवानाची वृक्ष आहेत. या आगीमध्ये अनेक लहान रोपटे जळून खाक झाली. त्याचबरोबर पावसाळ्यात उन्मळून पडलेले वृक्ष सुद्धा या आगीमध्ये जळाले. परिणामी वन विभागाचेही लाखो रूपयांचे नुकसान झाले. उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याने जंगलाला आगी लागण्याच्या घटना नेहमीच घडणार आहेत. मात्र या आगीला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाने सतर्क असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र वन विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे आग कुठे लागली याची माहिती वन विभागाला वेळीच मिळत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे, आंदोलनाचाही इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)जंगलात नियमित गस्त आवश्यकपुढील महिन्यात मोहफुलाचा हंगाम सुरू होत आहे. मोहफूल विकण्यासाठी जागा साफ करण्यासाठी अनेक नागरिक मोहफुलाच्या झाडाखाली आग लावतात. पुढे ही आग जंगलभर पसरते. त्याचबरोबर तेंदूपत्त्याच्या हंगामादरम्यानही जंगलांना आगी लावण्याच्या घटना नियमितपणे घडतात. त्यामुळे वन विभागाने आता विशेष सतर्क राहून जंगलात नियमितपणे गस्त घालणे आवश्यक आहे. प्रत्येक गावातील नागरिकाला वनपाल किंवा वनरक्षकाने स्वत:चा दूरध्वनी क्रमांक देऊन ठेवल्यास नागरिक याबद्दलची माहिती संबंधित वन कर्मचाऱ्याला देतील. वन विभागाच्या सहकार्याने सदर आग वेळीच आटोक्यात आणणे या उपायांमुळे शक्य होणार आहे.