शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो ; वनतस्करी वाढली

By admin | Updated: March 28, 2017 00:39 IST

वन विभागाच्या वतीने वनकर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.

कारवाईची मागणी : बहुतांश कर्मचारी गडचिरोली, मूलवरून करतात ये-जामुरूमगाव : वन विभागाच्या वतीने वनकर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. मात्र येथील बहुतांश वनकर्मचारी निवासस्थानी न राहता मूल, गडचिरोली, धानोरा, चंद्रपूर, आरमोरी, कुरखेडा यासारख्या शहराच्या ठिकाणावरून ये-जा करतात. जंगलाची तस्करी रात्रीच होते. मात्र कर्मचारी मुख्यालयी व कर्तव्यावर राहत नसल्याची बाब तस्करांना चांगल्या पद्धतीने ठाऊक असल्याने वनतस्करीचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. मुरूमगाव परिसरातील बहुतांश गावे जंगलांनी वेढले आहेत. येथील एकूण वन जमिनीच्या सुमारे ९० टक्के जमीन जंगलाने व्यापली आहे. त्यामुळेच मुरूमगाव वनपरिक्षेत्र कार्यालय दोन विभागात विभागण्यात आले आहे. मुरूमगाव पूर्व व पश्चिम असे दोन रेंज आहेत. जंगलाच्या संरक्षणासाठी शेकडो वनकर्मचारी व वनाधिकारी नेमण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून चांगल्या पद्धतीने कर्तव्य बजाविता यावे, यासाठी सुस्थितीतील निवासस्थाने बांधून दिली आहेत. मात्र या ठिकाणी काही निवडक वनकर्मचारी राहतात. इतर वनकर्मचारी दुसऱ्या गावावरून ये-जा करतात. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहणे सक्तीचे असले तरी मुरूमगाव वनपरिक्षेत्रातील बहुतांश वनकर्मचारी हा नियम धाब्यावर बसवित ये-जा करीत आहेत. मुरूमगाव ते गडचिरोलीचे अंतर जवळपास ६० किमी आहे. गडचिरोलीवरून मूल ५० किमी, आरमोरी ३० किमी अंतरावर आहे. म्हणजेच वन विभागाचे कर्मचारी जवळपास १०० किमी अंतरावरून ये-जा करतात. दुपारी १२ ते १ वाजता कर्तव्यावर पोहोचतात व दुपारी ३ ते ४ वाजताच जाण्याची तयारी सुरू करतात. सुट्या लागून आल्यानंतर एक दिवस अगोदर व नंतर ते आपल्या कर्तव्यावर येत नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे मुरूमगाव परिसरात मागील काही दिवसांपासून खुलेआम लाकडांची तस्करी केली जात आहे. मात्र याकडे वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.वनव्यावर नियंत्रण राहणार कसे?वनव्यामध्ये कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होते. उन्हाळ्यामध्ये वनवे लागण्याचे प्रमाण वाढते. वनवा लागल्यानंतर नागरिक याबाबतची माहिती संबंधित वनरक्षक किंवा वनपालाला देतात. दरवेळी सदर वनरक्षक किंवा वनपाल मुख्यालय सोडून गडचिरोली किंवा मूलमध्ये आहे, असे सांगतो. त्यावेळी नागरिकही हतबल होतात. वनकर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच मुरूमगाव वनपरिक्षेत्रात दरवर्षी आगी लागण्याचे प्रमाण इतर वनपरिक्षेत्रांच्या तुलनेत वाढले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.