शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रशासनाचाच खो

By admin | Updated: June 26, 2015 00:12 IST

भूजल पातळीत वाढ होण्यासाठी प्रत्येक शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविणे शासनाच्या वतीने ....

दिगांबर जवादे गडचिरोलीभूजल पातळीत वाढ होण्यासाठी प्रत्येक शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविणे शासनाच्या वतीने सक्तीचे करण्यात आले असले तरी गडचिरोली जिल्ह्यातील एकाही प्रशासकीय इमारतीवर सद्य:स्थिती रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा अस्तित्वात नसल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. यावरून दस्तुरखुद्द प्रशासनच शासनाच्या नियमांना खो देत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात हजारो मिली पाऊस पडते. मात्र पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने सदर पाणी नदी, नाले यांच्या माध्यमातून वाहून जाते. त्याचबरोबर पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्त हानी सुध्दा होते. उन्हाळ्यात मात्र तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊन घागरभर पाण्यासाठी दोन ते तीन किमीचा प्रवास करावा लागतो. ही विपरित परिस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा प्रत्येक प्रशासकीय इमारतीवर बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयानुसार प्रत्येक प्रशासकीय कार्यालयावर रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही यंत्रणा बसविल्याशिवाय नवीन इमारतीला परवानगीच देऊ नये, असे निर्देश नगर रचना खात्याला देण्यात आले आहेत. तसेच याबाबतच्या सूचना भूवैज्ञानिक कार्यालयालाही देण्यात आल्या आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे जिल्ह्यातील एकाही इमारतीवर ही यंत्रणा अस्तित्वात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. प्रशासकीय यंत्रणाच रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावत नसेल तर इतर नागरिक कशी काय स्वत:च्या इमारतीला ही यंत्रणा लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकाराकडे शासनाने लक्ष घालून प्रत्येक प्रशासकीय इमारतीवर अशा प्रकारची यंत्रणा लावण्याचे सक्त निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे.