शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

आधार कार्ड नोंदणीत नागरिकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2015 02:10 IST

शासकीय योजनांमधील गैरव्यवहार कमी करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक नागरिकाला ...

महेंद्र चचाणे  देसाईगंजशासकीय योजनांमधील गैरव्यवहार कमी करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड देण्याची मोहीम सन २०११ पासून सुरू करण्यात आली. आधार कार्ड तयार करण्याचे काम महाआॅनलाईन अंतर्गत केंद्र संचालकांना देण्यात आले आहे. आधार कार्ड नोंदणी मोफत करावयाची आहे. मात्र देसाईगंज शहरात दोन्ही केंद्रात आधार कार्ड नोंदणीसाठी प्रत्येक नागरिकांकडून ५० रूपये घेऊन केंद्र संचालक आर्थिक लूट करीत असल्याचे लोकमत प्रतिनिधीने शुक्रवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.देसाईगंज शहरात आधार कार्ड नोंदणीदरम्यान अनेक नागरिकांना आधार कार्ड काढण्याची पावती न देता केवळ क्रमांक लिहून दिला जात असल्याचीही बाब स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आली. मात्र सदर बाब तहसील कार्यालयीन प्रशासनाला माहित असूनही आर्थिक लूट करणाऱ्या केंद्र संचालकावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने तालुका प्रशासनाच्या कार्यप्रणाली प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.केंद्र शासनाने अतिशय अभिनव उपक्रमाद्वारे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण तयार करून जिल्हासह राज्यभरात सन २०११ पासून नोंदणी मोहिमेला शुभारंभ केला. प्रत्येक भारतीयांना स्वतंत्र ओळख सांगणारा १२ आकडी क्रमांक दिला जात आहे. केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक केले आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला आणि गॅसच्या सबसीडीचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक केले आहे. आधार कार्ड केंद्रातील संगणक चालकांनी प्रत्येक नागरिकांकडून ५० रूपये वसूल करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनांना काळीमा फासला जात आहे. आधार कार्डची नोंदणी मोफत करावयाची असताना नोंदणी करताना ५० व तयार झालेले आधार कार्ड देण्यासाठीही पैसे घेत असल्याचे लोकप्रतिनिधीने शुक्रवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून दिसून आले.