२० डिसेंबरला आयोजन : गणित, विज्ञान, बुद्धिमत्ता चाचणीगडचिरोली : लोकमत बालविकास मंच गडचिरोली व पेस कॅम्पस क्लबच्या वतीने गडचिरोली येथे लोकमत टॅलेन्ट सर्च परीक्षेचे आयोजन २० डिसेंबर ला दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या परीक्षेत गणित, विज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर आधारित प्रश्न राहणार आहेत. सदर परीक्षा जिल्हा परिषद हायस्कूल, गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे. टॅलेंट सर्च परीक्षा सीबीएसई बोर्ड व स्टेट बोर्डसाठी वेगवेगळी घेतली जाणार आहे. इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी करिता परीक्षा नि:शुल्क राहणार आहे. गणित, विज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर आधारित प्रश्नांवर सदर परीक्षा होणार आहे. प्रथम श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी करिता वेगवेगळा पेपर संच राहणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता पडताळून पाहण्यासाठी तसेच भविष्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी व तयारीसाइी सदर परीक्षा द्यावी व स्पर्धात्मक जगात उतरावे. परीक्षेसंदभातील अधिक माहितीसाठी लोकमत जिल्हा कार्यालय, त्रिमूर्ती चौक, गडचिरोली किंवा लोकमत बालविकास मंच जिल्हा संयोजिका किरण राजेश पवार (८००७१०९३१०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर १५ मिनीटे आधी उपस्थित राहावे, या परीक्षेला बसणाऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
लोकमत टॅलेंट सर्च परीक्षा
By admin | Updated: December 19, 2015 01:33 IST