शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नक्षलग्रस्त भागातही मतदानाची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 13:39 IST

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाय योजले जात आहेत. दुर्गम भागातील भामरागड तालुक्यात ताडगाव येथेसुद्धा बुधवारी रॅली काढून मतदान व आपली भूमिका यावर विस्तृत माहिती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाय योजले जात आहेत. दुर्गम भागातील भामरागड तालुक्यात ताडगाव येथेसुद्धा बुधवारी रॅली काढून मतदान व आपली भूमिका यावर विस्तृत माहिती देण्यात आली. वातावरण निर्मिती करून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली.‘मतदान करून लोकशाही रूजवू या’, ‘आपली जबाबदारी, आपले अधिकार व प्रगत भारताचे स्वप्न करू या साकार’ आदी घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, पालक, शिक्षक या रॅलीत सहभागी झाले होते. तहसीलदार कैलास अंडिल व गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावने यांच्या मार्गदर्शनात रॅली काढण्यात आली.रॅली यशस्वीतेसाठी ताडगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक झाडे, सरोज मडावी, चांगदेव सोरते यांच्यासह इतर शिक्षकांनी सहकार्य केले.

रांगोळीतून मतदान जागृतीचा संदेशभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, तसेच महिला मतदारांचा या प्रक्रियेत सहभाग वाढावा, या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धानोरा येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनी, शिक्षिका, पंचायत समितीचे कर्मचारी आदींनी सहभाग घेतला. सदर रांगोळीतून मतदार जनजागृतीचे संदेश, मतदानाचे महत्त्व व स्त्री-पुरूष समानतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी बाळू निमसरकार, नायब तहसीलदार भैसारे तसेच सेतू केंद्रात येणारे विद्यार्थी व नागरिक हजर होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक