शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; अवघ्या पाच उमेदवारांमध्ये रणसंग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:10 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात आता ५ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. या पाचपैकी ३ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे तर २ नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत. या लढतीत एकही अपक्ष उमेदवार नाही हे विशेष.

ठळक मुद्देएकही अपक्ष नाही : तीन मान्यताप्राप्त तर दोन नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या रणसंग्रामातून ६ उमेदवारांपैकी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनी माघार घेतली. त्यामुळे आता ५ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. या पाचपैकी ३ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे तर २ नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत. या लढतीत एकही अपक्ष उमेदवार नाही हे विशेष.लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी गुरूवारी शेवटचा दिवस होता. काँग्रेसची अधिकृत तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून नामांकन दाखल करणाऱ्या डॉ.किरसान यांनी गुरूवारी माघार घेतली. त्यामुळे आता अशोक नेते (भारतीय जनता पार्टी), डॉ.नामदेव उसेंडी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), आणि हरिचंद्र मंगाम (बहुजन समाज पार्टी) या तीन मान्यताप्राप्त (राष्ट्रीय/राज्य) पक्षांच्या उमेदवारांसह डॉ.रमेशकुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी) आणि देवराव नन्नावरे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया) या दोन नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.या उमेदवारांना गुरूवारी निवडणूक चिन्हांचेही वाटप झाले. त्यामुळे प्रचार साहित्य छपाईसाठी उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. पोस्टर्स, बॅनर्सपासून तर प्रचाराची वाहने सजवण्यापर्यंतच्या कामांना रात्रीच सुरूवात झाल्याचे दिसून येत होते.यासाठी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना कामांचे वाटप केले. पण त्यांचे काम योग्यप्रकारे होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. उमेदवारांचा दैनंदिन खर्च आणि आचारसंहिता भंगासह इतर प्रकारच्या तक्रारींच्या तपासणीसाठी निवडणूक आयोगाचे पर्यवेक्षक दाखल झाले आहेत.विधानसभानिहाय सोपविल्या जबाबदाऱ्याक्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या या मतदार संघात आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करून मतदारांना आपल्या बाजुने वळविण्याची जबाबदारी तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. भाजपने मतदार संघातील आपल्या ५ आमदारांना ही जबाबदारी दिली आहे, तर काँग्रेसने विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना कामी लावले आहे.१२ दिवसात पिंजून काढावी लागणार गावेसिरोंचा ते सालेकसापर्यंत भौगोलिककृष्ट्या राज्यात मोठ्या असलेल्या या मतदार संघात पुढील अवघ्या १२ दिवसात पोहोचून मतदारांना आपल्या बाजुने करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांपुढे आहे. प्रत्येक गावात पोहोचणे शक्य नसल्यामुळे त्यासाठी प्रसार माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर उमेदवार जोर देणार आहेत. शुक्रवारपासून वाहनांद्वारे जाहीर प्रचारालाही सुरूवात होत आहे.महिला उमेदवार नाहीचमतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघांमिळून ७ लाख ७३ हजार ८५० महिला उमेदवार आहेत. पुरूष मतदारांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण ४९.३३ टक्के आहे. असे असताना या मतदार संघात एकही महिला उमेदवार नाही. सुरूवातीला नामांकन दाखल करणाºया १० जणांमध्ये एका महिलेचा समावेश होता. परंतू त्यांचा अर्ज छाननीत रद्द झाला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक